सावित्रीबाई फुले विद्यालयात लागली आग, घटनास्थळी अग्निशामक दल दाखल, प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थी भारावले .
सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक 31-8-2024 सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापना विषयी माहिती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमासाठी राहुरी येथील अग्निशामक विभागास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते . या विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती देऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर अग्निशामक दल आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी कसे कार्य करते याचे प्रशिक्षण दिले व त्याविषयी मार्गदर्शन केले .
यावेळी अग्निशामक विभाग प्रमुख श्री .राजेंद्र पवार, फायर प्रमुख श्री. बाळासाहेब पवार, वाहन चालक अमोल गिरगुणे तसेच मदतनीस सनी गायकवाड , आशिष गायकवाड आणि स्वच्छता विभागाचे समन्वय राहुरी नगर पालिका पराग कुलकर्णी यांचा विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला . अग्निशामक प्रमुख राजेंद्र पवार यांनी आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावे याचे प्रशिक्षण विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर दाखविण्यात आले . गॅसचा भडका झाल्यानंतर कसा आटोक्यात आणायचा व दुर्घटना कशी टाळायची याचे प्रशिक्षण दाखविण्यात आले .
विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत या प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला . सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे अग्निशामक दलाने पाण्याचा फवारा सुरू करताच विद्यार्थ्यांनी फवारा स्वरूपात आलेले पाणी अंगावर घेत आनंद व्यक्त केला . त्याचप्रमाणे स्वच्छता विभागाचे समन्वय पराग कुलकर्णी यांनी कचरा विल्हेवाट व ओला कचरा व सुका कचरा प्लास्टिक कचरा यांचे वर्गीकरण करून विल्हेवाट कशी लावावी याविषयी मार्गदर्शन केले .
विद्यालयाचे प्राचार्य श्री .अरुण तुप विहिरे यांनी सर्वांचे आभार मानले . उपक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, प्राध्यापक जितेंद्र मेटकर , संगिता नलगे, संतोष जाधव, ऋषिकेश दातीर आदींनी परिश्रम घेतले .