बालाजी देडगाव येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक ११ जुनला जाहीर .दुरंगी लढत काट्याची टक्कर होण्याची शक्यता ?
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक जाहीर झाली असून ११ जून रोजी होणार मतदान.
या तालुक्यातील ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावात जोरदार निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मळ्या तळ्यात गुप्त बैठकीने जोर धरला आहे. या निवडणुक रिंगणात दुरंगी लढत होणार आहे. सोसायटीचे सुज्ञ मतदार कोणावर विश्वास टाकणार, या सोसायटीवर कोणाचा विजयाचा झेंडा लागेल. याची उत्सुकता देडगाव परिसर व संपूर्ण तालुक्याला लागली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार ही रिंगणात गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.
अतीशय पुरोगामी विचाराचे असणारं हे आदर्श बालाजी देडगाव या गावात रंगत ,संगत निवडणुकीचा इतिहास आहे .कधीही कुणाला गालबोट व शाब्दिक चकमक हि करत नाही .अतीशय उल्हास मय वातावरनात निवडणुक होणार आहे. बालाजी देडगावाचे नाव शांततेचे व संयम तेची ,समानतेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं .म्हणून ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणार आहे. हि निवडणूक वैचारिक पातळीवर लढवली जाणारी असून प्रत्ये क उमेदवाराचा स्वाभिमानाचा प्रश्न या ठिकाणी उभा राहणार आहे .अतिशय चुरशीची ही लढाई काट्याची टक्कर होणार का ?हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचे पुढे आहे.
महाराष्ट्र सहकारी सेवा संस्था निवडणूक यांच्या नियमानुसार अधिकाराचा वापर करून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक कार्यकारी यांनी जाहीर केलेल्या उपरोक्त सहकारी संस्थेच्या सदस्याच्या निवडणूक करिता सहाय्यक निबंध सहकारी संस्था तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने मौजे देडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारी संस्थेच्या समितीच्या सदस्य ची निवड करण्याचे त्याच्या निवडणुकीच्या विशेष टप्पे करीत मतदान संघाच्या संबंधातील निवडणुका जाहीर होत आहे.
नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची दिनांक ६ मे ते १२ मे असेल . नामनिर्देशन पत्राचा अर्जाची छाननी १३ मे ते १७ मे पर्यंत राहणार आहे. उमेदवाराला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची दिनांक १७ मे ते ३१ मे पर्यंत असणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निशाणी चे वाटप व अंतिम यादी चे प्रकाशन करण्याचा दिनांक १ जून रोजी होणार आहे .९ दिवस प्रचार साठी कालावधी असेल. मतदान ज्या दिवशी घेण्यात येईल तो दिनांक११ जून रोजी होणार . व मतदानाचे निकाल घोषित करण्याचा दिनांक ११ जून सायंकाळी ४ नंतर होईल.