देवळाली प्रवरा नगरपालिका आणि सोसायटी निवडनूकीत आघाडी धर्म पाळला नाही तर प्रहार स्वतंत्र लढणार..! - जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे
1.
राहुरी फॅक्टरी - दि. ८ मे २०२२
देवळाली प्रवरा नगरपालिका आणि सोसायटी निवडनुकीत घटक पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही तर प्रहार स्वतंत्र लढणार असे प्रहार जनशक्ती पक्षाच्या देवळाली प्रवरा येथील अंबिकानगर आणि राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर शाखेचे उदघाटन प्रसंगी प्रहार चे जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांनी सांगितले.
प्रसंगी बोलताना पोटे म्हणाले की, राज्यात घटक पक्षाचे आघाडी सरकार असून त्या मध्ये प्रहार सामील आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सोसायटी निवडणूक असेल, या निवडणूक लढविताना घटक पक्षाला प्रहारचा विसर पडू नये, देवळाली प्रवरा नगरपालिका व सोसायटी निवडणूकित जर आघाडीत प्रहार घटक पक्षाला जागा दिल्या तर त्या जागेवर लढू , नाहीतर संपुर्ण पॅनल प्रहार लढवणार, त्यासाठी प्रहार च्या सदस्यांनी तयार राहावे,
पुढे बोलताना पोटे म्हणाले की, आम्ही कधीही निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काम करीत नाही. अगोदर प्रश्न सोडवणेवर प्रहार चा भर असतो, येथील ४० वर्षा पासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रहारने सोडवला, आता येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, खाणीचा प्रश्न, अंगणवाडी प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे, आधार कार्ड, कुपण असे सर्व प्रश्न सोडविणे साठी प्रहार नेहमी आग्रही राहून हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे.
तसेच या ठिकाणी गोर गरीबावर कुणी अन्याय किंवा गुंडगिरी करीत असेल तर त्यांना प्रहार स्टाईलने उत्तर दिले जाईल त्यासाठी नागरिकांनी समोर येऊन तक्रार करावी.
प्रसंगी अड.पांडुरंग औताडे, कृष्णा सातपुते, आप्पासाहेब ढुस, बाळासाहेब खर्जुले, गणेश भालके, आदींची भाषणे झाली.
जिल्हा अध्यक्ष अभिजित दादा पोटे आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे हस्ते देवळाली प्रवरा येथील अंबिकानगर शाखेचे अध्यक्ष अमोल अंबिलवादे, उपाध्यक्ष मयूर कदम, सूर्यकांत परदेशी, सदस्य केतन रोडे, निलेश गलहे, विष्णू जाधव, विराज कुमावत तसेच प्रसादनगर शाखेचे अध्यक्ष अमोल साळवे, उपाध्यक्ष गोरख नरवडे, करण सोनवणे, सदस्य इम्रान पठाण, मनन सिंग, बंटी गायकवाड, पवन राजभर, रोहित काळे, दीपक विश्वकर्मा, मधू जगदाळे, दादा माळी, दिगंबर पगारे, विक्रम नरवडे, अरविंद वाघ आदी पदाधिकार्यांचा पद्ग्रहन सत्कार करणेत आला.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे कायदेशीर सल्लागार ऍड पांडुरंग औताडे, धरणग्रस्त जिल्हाध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे,श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष दीपक पटारे, तालुका युवा कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, तालुका संघटक रमेश भालके, युवा उपाध्यक्ष भैरवनाथ कांगुणे, देवळाली शहर अध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, अबिद शेख, ओंकार मुसमाडे, देवळाली महिला शहर अध्यक्ष भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, सचिव लैला शेख, उपाध्यक्ष वंदना कांबळे, अफसाना सय्यद, आशा माळी, सुरेखा शिंदे, दिव्यांग शहर अध्यक्ष सलीम शेख, मार्गदर्शक दादाभाई शेख, प्रभाकर कांबळे, सुनील कदम, बंटी लोंढे आदींसह अंबिकानगर व प्रसादनगर भागातील शेकडो नागरिक या शाखा उदघाटन समारंभास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांचे हस्ते राहता येथून आलेल्या पाच नागरिकांनी प्रहार मध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब ढुस यांनी केले तर गणेश भालके यांनी आभार मानले.