अहमदनगर भिंगार येथील आठ वर्षीय मुलाचे अपहरण करणारा आरोपी चोवीस तासाच्या आत जेरबंद. अपहरण झालेल्या मुलाला सुखरूपपणे ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रतिनिधी :-संभाजी शिंदे ,9604490993
केदार वस्ती ,शांतीनगर येथील अश्विनी क्षेत्रे हा आठ वर्षे मुलगा आपल्या राहत्या घराजवळ इतर मुलांसोबत खेळत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्याला त्या ठिकाणावरून पळवले.
ही गोष्ट काही वेळात मुलाच्या पालकांना कळताच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुलाब परसराम क्षेत्रे यांनी फिर्याद नोंदवली, त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर१८८/२०२२ भादवि ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
झालेले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व अंमलदार यांना पथक नेमून अपरण करता व अपहरण झालेल्या मुलास शोधण्यासाठी आदेश दिले.
क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक शोध मोहिमेत सक्रीय झाले.
गुप्त व खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर मुलाचे अपहरण हे त्याच्या ना त्यातीलच नागेश भिंगार दिवे यांनी केले असून तो सध्या अहमदनगर येथील स्टेट बँक चौकात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळताच. पोलिस पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, दिनेश मोरे ,संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी ,दीपक शिंदे, रवी सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल रोहित येमुल व पोलीस चालक हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर या सर्व पोलिस्पिन पथकाने चौकात शोध घेतला असत एका इसमाच्या संशयास्पद हालचालींचा आढावा घेत संबंधित इसमांची कसुन चौकशी केली असता तो नागेश चंद्रभान भिंगारदिवे वय (३५) राहणार दरेवाडी व हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी नागेश भिंगारदिवे त्याची कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली की त्यानेच अश्विन क्षेत्रे या मुलाचे अपहरण केले असून त्याने त्याला दौंड स्टेशन येथे पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये सोडले आहे.
तात्काळ पोलीस पथकाने पुणे रेल्वे स्टेशन येथे मुलाचा शोध घेतला असता अपहरण झालेल्या मुलगा मिळाला. सदर मुलास नाव विचारले असता त्यांने अश्विनी क्षेत्र असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले.
सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.