साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने संदीप एळवंडे सन्मानित .

साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने संदीप एळवंडे सन्मानित .

साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने संदिप एळवंडे सन्मानित.               

 

 

         . ओम आई विकास प्रतिष्ठाण व बी.बी.सी.फिल्म प्राॅङक्शन,महाराष्ट्र राज्य यासंस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन साईंच्या पावनभूमित शिर्डी येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सन्मानित करण्यात आले.

 

 

          यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुदाम संसारे ,उपाध्यक्ष वंदना गव्हाणे (अभिनेत्री) ,अभिनेता व गायक ङाॅ.अजय वारुळे ,चित्रपट निर्माता दिग्दर्शक काळूराम ढोबळे , माॅङेल व अभिनेत्री सोनी वासनिक ,उद्योजक व चित्रपट निर्माते सतिश पाटील खांङविकर या व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला. श्री.संदिप येळवंङे यांनी घोङेगांव या ग्रामीण भागातून नाट्यक्षेत्रात विविध भूमिका व नाट्यदिग्दर्शक करत कला जोपासली,त्यांनी आजपर्यंत एकूण 14 नाटकात विविधअंगी भूमिका केल्या व 5 नाटकाचे निर्माता दिग्दर्शनासह अभिनयही केला .दोन चित्रपटात व दोन मालिका मध्ये छोट्याशा भूमिका केल्या .

 

 

         एक वेबसिरीज व तीन लघुपटात भूमिका साकारल्या आहेत. शासनाच्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेत ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन त्यात सहभाग नोंदवून त्यांना हक्काचे व्यासपीठ करण्यात त्यांची नेहमी धङपङ सुरू असते . यापूर्वीही त्यांच्या कार्याबद्दल कांकरिया करंडक रौप्य महोत्सव वर्षानिमित्त "गौरव रंगभूमीचा सन्मान" हा सन्मान प्रदान करण्यात आला. खंडाळा जि:-संभाजीनगर येथील ग्रामीण राज्य नाट्य स्पर्धेतही उत्कृष्ट अभिनय पारितोषिक पटकावले आहे.. संदिप येळवंङे यांना शाळा व महाविद्यालयीन ईतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे परिक्षणासही आमंत्रित केले जाते . कोविङ कळात आपल्या कर्तव्यावर असतांना केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन महामहिम मा.राज्यपाल साहेबांच्या हस्ते "कोव्हिङ योद्धा" हा पुरस्कार देण्यात आला . ..                                                                        

 

          या सर्व कार्याची दखल घेऊन श्री.संदिप येळवंङे यांना "साई कलारत्न समाजभूषण" पुरस्काराने गौरविण्यात आले . याबद्दल घोडेगाव येथील नागरिकांनी व घोडेश्वरी सांस्कृतिक कला रंजन थिएटर घोडेगाव यांचे वतीने तसंदिप एळवंडे यांचे अभिनंदन करण्यात आले.