तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी राहुरी पोलिसांकडून जेर बंद
राहुरी ता प्रती - डॉ देवेंद्र शिंदे
*राहुरी पोलिस स्टेशन पथकाने 03 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस घेतले ताब्यात*
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुवर्ण प्रगती हाउसिंग मायक्रो फायनान्स लिमिटेड शाखा राहुरी येथे ग्राहकाकडून संकलन केलेले पैसे संस्थेत न भरता परस्पर अपहार केले प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 335/2025 भारतीय दंड संहिता कलम 420, 408 प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी अनिल बाळासाहेब पंडित रा. निमगाव खैरी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हा गुन्हा दाखल झाले पासून पसार झालेला होता. गेल्या तीन वर्षापासून पसार असलेला आरोपी शोधकामी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोउपनी. राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. गणेश लिपने यांचे पथक नेमून मा. वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे रायगड जिल्हा येथे पथक रवाना करण्यात आले होते. नेमलेल्या पाथकाने माणगाव पोलिसांच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे दोन दिवस अथक परिश्रम घेऊन माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दडून बसलेला आरोपी अनिल बाळासाहेब पंडित यास सीताफीने ताब्यात घेऊन अटक करून मा. न्यायालयात हजर करीत आहोत.
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक सो.श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोउपनी राजु जाधव, पोहेकॉ / राहुल यादव , पोकॉ. गणेश लिपने, सायबर सेल श्रीरामपूर येथील पोहेकॉ. संतोष दरेकर, पोहेकॉ. सचिन धनाड यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ. राजु जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. गणेश लिपने हे करीत आहेत.









