राहुरी तालुक्यातील नवीन रेल्वे लाईन साठी भुसंपादन होऊ नये यासाठी प्रांत साहेबानां निवेदन

राहुरी तालुक्यातील नवीन रेल्वे लाईन साठी भुसंपादन होऊ नये यासाठी प्रांत साहेबानां निवेदन

राहुरी ता प्रति - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी तालुक्यातील नवीननवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करणे कामी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या

असून या हालचाली सर्व शेतकऱ्यांनी या हालचालीसाठी विरोध केला आहे या रेल्वे लाईन साठी राहुरी तालुक्यातील उंबरे कोंडवड शेलगाव करपरा ब्राह्मणी रेल्वे स्टेशन राहुरी अशा अजून इतर काही बागायत भागातील जमिनी शासन संपादित करणार असून त्याला सर्व शेतकरी वर्गातून कडाडून विरोध करणार आहे एकही इंच जमीन शासनाला जाऊ देणार नाही कारण आमच्या उदरनिर्वाचा प्रश्न निर्माण होईल आणि भूमीहीन होऊ आमच्या प्रपंचाचा प्रश्न असल्याकारणाने आम्ही सर्व स्तरावरून कडाडून विरोध करणार आहे शेतकऱ्यांच्या असे म्हणणे आहे की आमचे रक्त सांडले तरी चालेल पण आम्ही एकही जमीन जाऊ देणार नाही

यासाठीसर्व शेतकरी बांधव व माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे या ठिकाणी प्रांत साहेबांना निवेदन देण्यात आले व विरोध दर्शविण्यात आला जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्याने तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची प्राजक्ता दादा तनपुरे यांनी निवेदनाद्वारे सांगितले