सोनई नाभिक समाजाचे कार्य इतरांसाठी आदर्शवत सुनील गडाख यांचे गौरवोद्गार; कोरोना एकल कुटुंबाला आर्थिक मदत

सोनई नाभिक समाजाचे कार्य इतरांसाठी आदर्शवत  सुनील गडाख यांचे गौरवोद्गार; कोरोना एकल कुटुंबाला आर्थिक मदत

सोनई नाभिक समाजाचे कार्य इतरांसाठी आदर्शवत

सुनील गडाख यांचे गौरवोद्गार; कोरोना एकल कुटुंबाला आर्थिक मदत

दिल्ली 91 वृत्तांत.

 "समाजाप्रती सजग राहणे आवश्यक आहे. सोनईतील नाभिक संघटना विधायक कामांसाठी ओळखली जाते. आजही त्यांनी कोरोना एकल कुटुंबासाठी केलेली आर्थिक मदत इतरांसाठी आदर्शवत आहे," असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांनी केले. जिवाजी महाले जयंती निमित्त मिरवणुकीस गडाख यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

 

शूरवीर जिवाजी महाले जयंती निमित्त सोनई नाभिक संघटनेतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या नाभिक कारागिर राहुल औटी यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत, तिच्या नावे पोस्टात फिक्स डिपाँझिट करण्यात आले. सोनई नाभिक संघटनेने वर्गणीतून केलेली ही मदत सुनील गडाख यांच्या हस्ते औटी कुटुंबाला देण्यात आली. या कार्यक्रमात गडाख यांनी सोनई नाभिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश राऊत व सदस्यांच्या कार्याचे कौतूक केले. दरम्यान, सकाळी युवा नेते उदयन गडाख यांनी सेना महाराज मंदिरास भेट देत जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

 

नेवासा तालुक्यातील सुमारे पाचशेहून अधिक नाभिक युवक मिरवणुकीत सहभागी झाले होते. सेना महाराज मंदिरातून निघालेली भव्य रथातून सजविलेली प्रतिमा मिरवणूक सुमारे दोन तास चालली. सोनईतील सकल हिंदू समाजही मिरवणुकीत सहभागी झाला होता. अमोल कोरडे, अमोल भागवत, प्रविण कदम, अतुल राऊत, आबा भागवत, वैभव वाघमारे, मंगेश वाघमारे, तात्यासाहेब कोरडे, अनंत कोरडे, संतोष दुधाडे, सोन्या कोरडे, दीपक तुळसे, नितीन वाघमारे, दिनेश शिंदे सर, नितीन शिंदे, अक्षय शिंदे, बबलू राऊत, वैभव राऊत, गणेश राऊत, मंगेश कोरडे, ऋषी कोरडे, अमोल क्षीरसागर, सुरज भागवत, गणेश औटी आदी यावेळी उपस्थित होते.