विनयभंगाच्या आरोपातून बीएमसी कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता : दिंडोशी सत्र न्यायालयाचा निकाल.

अल्पवयीन पॅथॉलॉजी रिसेपशनिस्ट च्या विनयभंगाच्या आरोपातून बीएमसी कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता
मुंबई प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
सविस्तर_ मुंबई समतानगर पोलिस स्टेशन च्या हद्दीमध्ये, एका अल्पवयीन पॅथॉलॉजी रिसेपशनिस्ट च्या विनयभंगाची घटना 2014 मध्ये घडली होती.
पीडितेच्या कथनानुसर कांदिवली परिसरात असलेल्या एका पॅथॉलॉजी मध्ये दुपारच्या वेळी अल्पवयीन मुलगी एकटी असताना, तेथे एक अनोळखी इसम गेला व त्याने त्या मुलीचा विनयभंग करून तिथून पळून गेला.
मुलीच्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहिता तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर घटनेच्या सात महिन्यानंतर पोलिसांनी बीएमसी कर्मचारी असलेल्या आरोपी कमलेश वाघेला याला या गुन्ह्यात अटक केली होती. जवळपास दहा वर्षे चाललेले या केस मध्ये दिंडोशी सत्र न्यायालयासमोर पाच साक्षीदार तपासले गेले व माननीय सत्र न्यायाधीश श्री. ए. ए . कुलकर्णी यांनी आरोपीस निर्दोष मुक्त केले.
ज्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी अल्पवयीन मुलगी काम करत असल्याचा पुरावा पोलीस न्यायालयासमोर उपलब्ध करू शकली नाही, वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या गुन्हा घडून सुद्धा एकही स्वतंत्र साक्षीदार पोलीस आणू शकले नाही, लॅबच्या बाजूला एटीएम होते त्यामध्ये सीसीटीव्ही असून सुद्धा गुन्हा संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले नाही, त्यामुळे आरोपीला निर्दोष सोडण्यात यावे असे आर्ग्युमेंट आरोपीच्या वतीने एड. नितीन हजारे यांनी केले.
न्यायालयाने आरोपींचे काही मुद्दे मान्य करत सात महिन्यांनी आरोपीला पकडले तरीसुद्धा या केस मध्ये ओळख परेड घेतली गेली नाही, सात महिन्यांच्या दरम्यान पोलिसांनी काय तपास केला याबद्दल कोर्टासमोर काहीही मटेरियल आणले नाही, पिडीत मुलीच्या सांगण्यावरून जे आरोपीचे स्केच बनवले होते त्यावर मुलीची किंवा पोलिसांची सही नव्हती, पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये मुलीला दाखवलं होतं. अशा सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की जरी घटना घडली असे गृहीत धरले तरी या आरोपीच्या त्या घटने सोबत संबंध आहे हे दाखवणारे कुठलेही साक्षी पुरावे पोलीस सादर करू शकले नाहीत आणि आरोपीस न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
या केसमुळे आरोपीचे मोठे नुकसान झाले असून, गेल्या १० वर्षापासून त्याला नोकरीवरून देखील काढून टाकलेले आहे, कुटुंबामध्ये उदरिर्वाहासाठी सुद्धा अनेक अडचणी आलेल्या आहेत, असे पॅरा लीगल वॉलेंटियर स्वस्ति सिंग यांनी सांगितले.