फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी पोलिस विभागाची मान उंचावत केली दबंग कारवाई . 52 ,15,200 /रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त .

फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी पोलिस विभागाची मान उंचावत केली दबंग कारवाई . 52 ,15,200 /रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त .

                औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहा .पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी पोलीस विभागाची मान उंचावत सुमारे 52 ,15,200 रुपये किमतीचा गुटखा व पान मसाले असा मुद्देमाल जप्त करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे . दि. 06/05/2022 रोजी फर्दापूर .पोलीस ठाण्याचे सहा .पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांना त्यांच्या गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली . पोलीस ठाणे फर्दापूर हद्दीत जळगाव ते औरंगाबाद हायवे रोड ने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधी तंबाखू यांची आयशर कंटेनर मध्ये चोरटी वाहतूक करून विक्री करण्यासाठी जाणार आहे .अशी खात्रीलायक बातमी मिळताच वेळेचा विलंबही न करता स.पो.नि.देविदास वाघमोडे व त्यांच्या पथकाने तात्काळ संध्याकाळी सुमारे 07:00 वाजेच्या दरम्यान जळगाव ते औरंगाबाद हायवे रोडवर हॉटेल कन्हैया कुंज येथे सापळा लावण्यात आला .

       यावेळी मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांना समोरून एक आयशर कंटेनर वाहन येताना दिसले .सदर वाहन चालकाला मोठ्या शिताफीने थांबविण्यात पोलिसांना यश आले .चालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला .वाहन चालकाला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव हमीद हरून खाँ वय 35 वर्षे रा . नखरोला . जि. पलवल हरियाणा येथील असून सदर वाहन हे दिल्ली येथून घेऊन सोलापूर कडे जात असल्याचे सांगितले .

           या आयशर कंटेनरची ( HR -73 -A - 2236 )पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 29,95,200 / -रुपये किमतीचा प्रीमियम राजनिवास पान मसाल्याच्या 78 गोण्या व प्रीमियम एक्स एल सुगंधी तंबाखू च्या 15 गोण्या सुमारे 7 ,20,200 / - रू .किमतीच्या असून लाल रंगाचा आयशर कंटेनर अंदाजे रक्कम 1500000 / - रू. असा एकुण 52,15,200 / - रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

      या घटने दरम्यान वाहन चालक हमीद हरूण खाँ याच्यावर पोलीस ठाणे फर्दापुर येथे गुरनं . 41 / 2022 कलम 188, 273 ,328,भा द वि व कलम 59 अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालकास अटक करण्यात आली आहे .या धडाकेबाज कारवाईने श्री वाघमोडे व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच पुढील तपासही सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे हे करीत आहे .

       सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मा. मनीष कलवनिया, अपर पोलीस अधीक्षक मा.पवन बनसोड,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विजय कुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. देविदास वाघमोडे ,पोलीस अंमलदार सचिन काळे, योगेश कोळी प्रदीप वेदरकर यांनी केली आहे .