देडगाव येथे ह भ प भाग्यश्रीताई यांच्या काल्याच्या कीर्तनाने मारुतीचा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

देडगाव   येथे  ह भ प भाग्यश्रीताई यांच्या काल्याच्या कीर्तनाने मारुतीचा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस

पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कुकाणा रोड (कुटे वस्ती )येथील हनुमंत रायाचा अखंड हरिनाम सप्ताह शांतीब्रह्म ह भ प भास्करगिरीजी महाराज व स्वामी महंत प्रकाशनंद गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प गाथा मूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली चालत आलेल्या अखंड नाम सप्ताह निमित्ताने श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दि.१२रोजी पासून करण्यात आले होते.

        श्रीमद् भागवत कथा प्रवक्त्या ह भ प भाग्यश्रीताई समीरजी देवढे यांच्या सुमधुर, रसाळ वाणीतून श्रोत्यांनी श्रीमद् भागवत कथेचे श्रवण केले. या कथेसाठी गायनाचार्य ह भ प समीरजी देवढे , तबलावादक सचिन गुरमुले, सिंथवादक सचिन कवासे ,झाकी दर्शन देणारे सोमलाल बाबा व तबलावादक यांनीही मोलाची साथ दिली.शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण ,हरिपाठ, जागर असे अनेक धार्मिक उपक्रम राबवण्यात आले.

     तर श्रीमद् भागवत कथेमध्ये भागवत महात्म्य, श्री परीक्षेत जन्म , ध्रुव बाळ चरित्र ,भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव ,बाललीला ,गोवर्धन पूजा ,रुक्मिणी स्वयंवर ,भक्त सुदामा चरित्र असे अनेक प्रसंग व यानिमित्ताने झाकीदर्शना च्या माध्यमातुन भाविकांना पाहावयास मिळाले. दररोज कथेनंतर आरतीचे आयोजनही करण्यात आले होते त्यामध्ये नवनवीन जोडप्यांनी सहभाग घेतला होता. या मंदिर परिसरामध्ये मोठी विद्युत रोषणाई ही करण्यात आली होती तर मुलीनी डोक्यावर कलश घेऊन कुटे वस्ती परिसरामध्ये फटाक्याच्या आतषबाजी मध्ये मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये महिला भाविकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. दररोज सायंकाळी दानशूरदात्याच्या वतीने अन्नदानाचेही आयोजन करण्यात आले होते.

        शेवटच्या दिवशी ह भ प भाग्यश्री ताई महाराज देवढे यांनी काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडत या सप्ताहाची सांगता केली. यानंतर काल्याच्या कीर्तनानिमित्ताने महाप्रसाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शिवशक्ती तरुण मंडळ, बालाजी जय हरी भजनी मंडळ, ह भ प मीनाताई कुटे, व ह भ प कविताताई कदम व कुकाणा रोड परिसरातील सर्व भाविकांनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले.