विश्वास संपादन करून ट्रॅक्टर खरेदी संदर्भात मोठी फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांकडून मुद्देमालासहअटक.

विश्वास संपादन करून ट्रॅक्टर खरेदी संदर्भात मोठी फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली  पोलिसांकडून  मुद्देमालासहअटक.

ट्रॅक्टर खरेदी संदर्भात शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून फसवणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

          खोडद, गडाची वाडी , तालुका जुन्नर येथील रहिवासी असणाऱ्या प्रसाद चिंतामण हिंगे या शेतकऱ्याने अहमदनगर येथील नाथ मोटर्स जुने वाहन खरेदी विक्री मार्फत शेतीकामासाठी 20 21 मध्ये कुबोटा कंपनी चा ट्रॅक्टर खरेदी केला होता.

        यामध्ये ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे म्हणजे ५.८०.००० पैकी१.८०.०००विसार देऊन उरलेली रक्कम दोन दिवसात आणून देतो असे ठरलेले असताना माझा विश्वास संपादन करून आरोपी रामचंद्र ज्ञानदेव भागीरे राहणार सोलनकरवाडी या व्यक्तीने माझा विश्वास संपादन करून उर्वरित रक्कम आणून देतो असे सांगितले ,परंतु रक्कम न देऊन त्याने माझा विश्वासघात केला.अशी फिर्याद चिंतामण हिंगे यांनी कोतवाली पोलिस येथे दिली.त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर T२४४/२०२२ भादवि कलम ४०६,४२० प्रमाणे दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

        या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक विष्णू भागवत, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी यांना सोलंकरवाडी येथे आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला असता सदरचा ट्रॅक्टर त्या ठिकाणी आढळला त्याचप्रमाणे आरोपी रामचंद्र हा या ठिकाणी सापडला त्याला अटक करण्यात आली.

        सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार डी .बि .ढगे करीत आहे. 

        या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे , सहायक फौजदार डी बी ढगे, पोलीस नाईक बंडू भागवत, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, पोलीस नाईक रवींद्र टकले, पोलीस नाईक संतोष गोमसाळे, सागर पालवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे यांच्या पथकाने केली.