अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारास मदत करणाऱ्या तहसिलदारास सेवेतून तात्काळ निलंबित करा - देवेंद्र लांबे पा.
ना.तहसीलदार यांना निलंबित करा.- देवेंद्र लांबे पा.
(राहुरी प्रतिनिधी) -
अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारास मदत करणाऱ्या तहसीलदारांना सेवेतून तात्काळ निलंबित करा अशा आशयाचे निवेदन शिवसेना पदाधिकारी यांनी राहुरी येथील तहसीलदार यांच्या माध्यमातून जिल्हाधीकारी यांना निवेदन देण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा संदर्भात बोगस ठेकेदाराबाबत श्रीरामपूर तहसील कार्यालयात यापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन दिले होते. याची सूचना नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांनी त्या अवैध वाळू उपासा करणाऱ्या ठेकेदारांना दिली. यावरून अवैध वाळू उपसा करणारे ठेकेदार यांनी राग येऊन राजेंद्र देवकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे देवकर यांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे. तसेच ते फोनवरून धमक्या देखील देत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत कठोर निर्णय घेऊन ठेकेदारांवर कारवाई करणे ऐवजी त्याला माहिती देणाऱ्या नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना तातडीने सेवेतून विलंबित करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पदाधिकारी यांनी दिला आहे. निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठविण्याचे आश्वासन राहुरी येथिल तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिले आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे तालुका संपर्कप्रमुख अशोक तनपुरे तालुका उपप्रमुख प्रशांत खळेकर, महेंद्र उगले, बापूसाहेब काळे, सतीश चोथे, महेंद्र शेळके उपस्थित होते.