नगर - मनमाड रस्त्यावर रस्ता दुरुस्ती कृती समिती यांच्यावतीने होणार वर्षश्राद्ध आंदोलन .

नगर - मनमाड रस्त्यावर रस्ता दुरुस्ती कृती समिती यांच्यावतीने होणार वर्षश्राद्ध आंदोलन .

नगर-मनमाड रस्त्यावर रस्ता दुरुस्ती कृती समिती यांच्यावतीने होणार “वर्षश्राद्ध” आंदोलन  

 

 

 

 

 

(राहुरी प्रतिनिधी) – राहुरी येथे नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने राहुरी तहसीलदार चंद्रजीत राजपुत यांना रविवार दि.३ डिसेंबर २०२३ रोजी नगर मनमाड रस्ता दुरुस्त केला गेला नाही म्हणून प्रशासनाचा निषेध म्हणून प्रतिकात्मक “वर्षश्राद्ध” घालण्यात येणार असल्याचे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे पा.यांनी सांगितले.   

 

 यावेळी बोलतांना श्री.देवेंद्र लांबे पा.म्हणाले कि , नगर कोपरगाव (NH 160) या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी ऑक्टोबर २०१९ पासून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने वेळोवेळी अनेक आंदोलने करून प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आला आहे.मागील वर्षी ३ डिसेंम्बर २०२२ रोजी याच रोडवर अपघातात निधन पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून नगर मनमाड रोडवर सूतगिरण, जोगेश्वरी फाटा येथे दशक्रिया विधी घालण्यात आला होता.

 

 ३ डिसेंबर २०२३ रोजी या आंदोलनाला तब्बल १ वर्ष पूर्ण होत असून प्रशासनाकडून अजूनपर्यंत या रोडच्या कामाला सुरुवात केलेली दिसत नाही.एकेरी वाहतूक,रोडवर पडलेली खड्डे यामुळे दररोज अपघात होवून अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत.मागील वर्षी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजी काम चालू करण्याचे पत्र देवून देखील काम करण्यात आलेले नाही.त्याच्या निषेधार्त नगर मनमाड रस्त्यावर जोगेश्वरी फाट्याजवळ रविवार दि.३ डिसेंम्बर २०२३ रोजी प्रशासनाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे देवेंद्र लांबे पा.यांनी सांगितले.

 

या प्रसंगी कृती समितीचे सुनील विश्वासराव यांनी नगर मनमाड रस्त्यावर स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्षश्राद्ध आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

या प्रसंगी अशोक तनपुरे,प्रशांत खळेकर,राजेंद्र लबडे,अरुण निमसे,सतिश चोथे,जालिंदर अडसुरे,सचिन बोरुडे,अविनाश क्षीरसागर,राजेंद्र उंडे,अक्षय कोहकडे,अड.सुरेश तोडमल,अड.प्रकाश गागरे,भारत शेडगे,सचिन जाधव,किशोर गोसावी आदी उपस्थित होते.