संस्कृतीचे जतन करीत किड्स किंग्डम विद्यालयात बैल पोळा साजरा.

खेडले परमानंद प्रतिनिधी
संस्कृतीचे जतन करीत किड्स किंग्डम विद्यालयात बैल पोळा साजरा
. सोनई येथील किड्स किंग्डम विद्यालयात बैल पोळा सण मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला शेतकरी हा जगाचा पोशिंदा बैलपोळा हा सण बळीराजाच्या जीवनात बैलपोळा सणाला महत्त्वाचे स्थान वर्षभर आपल्या सर्जा राजाचा साथीने बळीराजा शेतात काबाडकष्ट करतो त्याच सर्जा राजाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजे बैलपोळा या सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधव आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवून मिरवणूक काढतात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बैलपोळा सणाचे अन्नसाधारण महत्त्व आहे याचे औचित्य साधून किड्स किंग्डम विद्यालयात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बैलाची पूजा केली आणि आणि सुंदर असे नृत्य सादर करून कार्यक्रम सादर केला त्यामुळे त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढवली किड्स किंग्डम विद्यालयांमध्ये प्रत्येक सणाला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे या विद्यालयाची खासियत वाढत आहे उत्तम नियोजन उत्तम सादरीकरण त्यामुळे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील स्टॉप मेहनत घेत असतो विद्यालयाच्या प्राचार्य कीर्ती बंग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात येतात हे करत असताना शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे व त्यांच्या अभ्यासाकडे बारीक लक्ष असते त्यामुळे विद्यालय हे निकालाची परंपरा राखून आहे अशीच विद्यालयाची प्रगती होऊ हीच अपेक्षा