बालाजी देडगाव येथील मुंगसे वस्ती (लालगेट) येथील रस्त्याचे उद्घाटन संपन्न.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मुंगसे वस्ती लाल गेट येथील दळवी वस्ती ते लालगेट, लाल गे
ट ते शहापूर पूल रस्ता , शहापूर पूल ते देडगाव रोड या रोडचे उद्घाटन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून मा. सभापती सुनीताताई शंकरराव गडाख व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी लालगेट परिसराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे होते .तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवरांचे सत्कार लालगेट ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी सुनीताताई गडाख म्हणाल्या की लालगेट परिसराची ही रोडची मागणी असल्याने अतिशय दुर्मिळ अवस्था होती म्हणून या रोडचे काम लगेच सुरू करणार . व जमिनीतील पोट खराब संदर्भातील प्रश्न , सिंगल फेज,नवीन लाईट ट्रांसफार्मर बाबतीत असणारे प्रश्न अशा विविध विषयावर चर्चा करत आम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहोत तुमचे विकास काम करणे आमचे कर्तव्यच आहे .तुम्ही हक्काने कामे सांगा निश्चित करण्याचा प्रयत्न करू .अशी ग्रामस्थांना ग्वाही दिली..
या कार्यक्रमास पंचायत समितीचे मा. उपसभापती कारभारी चेडे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे ,सोसायटीचे माजी सचिव सूर्यभान सोनवणे भाऊसाहेब, मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, मा. चेअरमन निवृत्ती मुंगसे, मा. चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुंगसे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, मा.चेअरमन योसेफ हिवाळे, महादेव मुंगसे, सुरेश दादा कुटे, भारत कोकरे व लालगेट परिसरातील ग्रामस्थ , तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार बाळासाहेब मुंगसे यांनी मानले.