बालाजी देडगाव येथे ग्रामपंचायत नूतन उपसरपंच पदी केशर महादेव पुंड यांची निवड.
बालाजी देडगाव:- ( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक ही माजी मंत्री विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे , कुंडलिक पाटील मुंगसे,ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, खरेदी विक्री संघाचे मा. संचालक कडूभाऊ तांबे , भाऊसाहेब मुंगसे, यांच्या अधिपत्याखाली बालाजी ग्राम विकास पॅनल चे सरपंच पदासाठी चंद्रकांत भानुदास मुंगसे सह सदस्य साठी १५ पैकी १२ उमेदवाराचा दणदणीत विजय झाला होता .
२३ रोजी ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी कोकरे रत्नमाला लालबहादूर व पुंड केशर महादेव यांचे अर्ज आले होते. कोकरे रत्नमाला यांना अर्जुन कोकरे हे सुचक होते. तर पुंड केशर महादेव यांना ससाणे अभिजीत भाऊसाहेब हे सुचक होते. ही निवडणूक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली असून या निवडणुकीसाठी गुप्त मतदान करण्यात आले.
यावेळी निरीक्षक तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा सुरेश पाटेकर साहेब तर निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास संतोष उल्हारे भाऊसाहेब लाभले. तर सरपंच तथा अध्यासी अधिकारी म्हणून चंद्रकांत भानुदास मुंगसे व या निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब मस्के व गणेश तांबे यांनी विशेष नियोजन करत सहकार्य केले.
ही निवडणूक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तर पोलीस नाईक किरण पवार यांनी बंदोबस्त दिला.
या निवडणुकीत कोकरे रत्नमाला लालबहादूर यांना ४ मते तर पुंड केशर महादेव यांना १२ मते मिळाली.
१२ मताने पुंड केशर महादेव यांचा विजय झाला असून उपसरपंच पदासाठी नाव जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायत व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व सन्मान करण्यात आला.
या निवडणूक प्रक्रियेसाठी सरपंच चंद्रकांत भानुदास मुंगसे ,तर सदस्य ससाणे अभिजीत भाऊसाहेब ,मुंगसे पोपट विठ्ठल, गोयकर अलका कानिफनाथ , मुंगसे मीनाक्षी लक्ष्मण , तांबे अंबादास काशिनाथ ,मुंगसे बाळासाहेब ज्ञानदेव, दळवी सुषमा आनंद ,खांडे जालिंदर एकनाथ , मुथा राधिका अनिकेत ,हिवाळे मार्था विश्वास,गायकवाड उषा संजय , कोकरे अर्जुन लक्ष्मण कदम अविनाश तर ग्रामस्थ बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वस्त सुनील शेठ मुथा , बाळदेवा तांदळे, जय हरी संजय मुंगसे, ह भ प सुभाषराव मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, निवृत्ती मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, बंडू कुठे, पै.नवनाथ मुंगसे, पै. रामा टकले, सोसायटीची संचालक प्रमोद रक्ताटे, अकबर भाई पठाण ,अन्वर सय्यद, अरुण मुंगसे, संजय हिवाळे, श्रीमंत पुंड, सुभाषराव मुंगसे भाऊसाहेब मुंगसे, पावन गणपतीचे अध्यक्ष संभाजी मुंगसे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे, कैलासनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम अरुण वाढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बालाजी देवस्थानच्या वतीने ही सन्मान करण्यात आला. व विविध संघटनेच्या ,शाखेच्या वतीने ही सन्मान करण्यात आला.
या नूतन उपसरपंच , सरपंच व सदस्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.