शिक्षकांच्या शिस्तीने विद्यार्थी घडले. भानुदास धाडगे.

शिक्षकांच्या शिस्तीने विद्यार्थी घडले.  भानुदास धाडगे.

शिक्षकांच्या शिस्तीने विद्यार्थी घडले.

भानुदास धाडगे.

घोडेगाव (वार्ताहर) आज शाळेतील मुलांना शिस्त लावायची मोठे जिकिरीचे काम झाले आहे.तिस वर्षा पुर्वी तुमच्या वेळी तसं नव्हतं. मुलांनी खेळावं ,तसा अभ्यास करावा, वेळेत वर्गात नियमित यावं . शाळेतील शिस्त पाळावी .हा दंडक होता. काही ठिकाणी रात्रीच्या अभ्यासिका शिक्षक चालवत .त्यास स्थानिक मुलांनी येऊन अभ्यास करायचा . एकमेकांना विचारुन प्रश्न सोडवायचे.त्यात सांघिक सहकार्याची भावना होती. चांगले गुणवंत विद्यार्थी घडावेत शाळेचे ,गावाचे नाव व्हावे त्यात शिक्षकांचे परिश्रम दिसून यायचे. तेव्हा कडक शिस्त होती. विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर ते घरी सांगत नसत. सांगीतले तर पालक शिक्षकांना सांगत की याने अभ्यास केला नाही टारगटपणा केला तर खुशाल हाना अशी मुभा होती. तेव्हा शिक्षक पालक संघ नसले तरी शिक्षक पालका मधे सुसंवाद होता. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांची साथ मिळायची. म्हणुन शिक्षक विद्यार्थी,वर्ग शाळेत कडे जातीने लक्ष द्यायला. प्रसंगी कठोर शिक्षा देऊन विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी झटायचा. 

शिक्षकांचे कडक शिस्तीनेच सन७३ -७४ च्या बॅचचे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आज डॉक्टर ,वकील,

इंजिनियर, ऑफिसर,शिक्षक,राजकीय पदाधिकारी ,प्रगतशिल शेतकरी,उत्तम व्यवसायिक म्हणून नावारुपाला आले. आज ३९ वर्षा नंतर अनेक जण निवृत्त झाले प्रपंचाचा रगाड्यात तुम्हाला आम्हा शिक्षकांची आठवण झाली यातच सगळं मिळालं .असे भावनिक उदगार भानुदास धाडगे गुरुजी यांनी घोडेगाव येथील माजी विद्यार्थी स्पेन मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

 गुरुवारी सोनई रोडवर श्रीनाथ मंगल कार्यालय येथे मेळावा घेण्यात आला अध्यक्षपदी भानुदास दांडगे गुरुजी होते. प्रमुख पाहुणे गोधाजी गोन्टे गुरुजी उपस्थीत होते. त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर चाळीस माजी विद्यार्थी हजर होते. धाडगे व गोन्टे गुरुजी यांचे हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. 

   मेळाव्यात प्रथम मयत विद्यार्थी मित्रांना श्रध्दांजली अर्पण केली गेली. प्रस्तावना मधे उद्देश सांगितला गेला. पाहुण्यांची ओळख भैरवनाथ वाघ यांनी करुन दिली. 

  ईंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक म्हणून गोन्टे गुरुजी यांचा दबदबा होता. नवीनच रुजु झालेले असले तरी जवळच्याच मिरी गावचे असल्याने ओळखही होतीच .त्यांनीही शिक्षक जीवनातील विद्यार्थी,पालक,सह शिक्षक यांचे मजेदार किस्से सांगुन हास्याचे फवारे उडविले.

 माजी विद्यार्थी निवृत्त कला शिक्षक अरुण कदम ,राजाराम नजन, 

निवृत्त सहा फौजदार संभाजी शेंडगे,शिवनाथ होंडे, भाऊसाहेब दातीर ,बाबासाहेब रावडे यांनी शालेय जीवनातील किस्से शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन यावर मनोगत व्यक्त केले. २४च्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी पुन्हा जास्तीत जास्त संख्येने एकत्र येण्याचं एकमेकांना वचन देऊन मैत्रीचा धागा जपत निरोप घेतला.

  प्रास्ताविक शंकर शेंडगे यांनी केले,आभार नबाजी सोनवणे यांनी व्यक्त केले.