शनिशिंगणापूर रस्त्यावर प्रवाशांची नाराजी,काय रस्ता,काय भेगा, काय खड्डे ...सगळंच काम कसं निकृष्टच .

शनिशिंगणापूर रस्त्यावर प्रवाशांची नाराजी,काय रस्ता,काय भेगा, काय खड्डे ...सगळंच काम कसं निकृष्टच .

नगर जिल्ह्यामध्ये शनिशिंगणापूर हे देशभरामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे .देशभरातील भाविक शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर शनिशिंगणापूर येथे शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात .राहुरी मार्गे शनिशिंगणापूर कडे जाणारा हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला होता . शासनाने याची दखल घेऊन व भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे तसेच या रस्त्याची रुंदीही वाढवण्यात आली आहे .

     शनिशिंगणापूर रस्त्याचे काम चालू असताना या कामांमध्ये आडवे येणारे ओढे, नाले , नदी यावर पूल बांधण्यात आले आहे .साधारणतः 1वर्षापासून हा रस्ता प्रवासासाठी खुला करण्यात आला आहे .परंतु या रस्त्याचे काम उत्कृष्ट झाले की नाही याची दखल घेण्यात आलेली दिसत नाही .संबंधित ठेकेदाराने या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे .

        एक वर्षांपूर्वी काम झालेल्या या रस्त्यावर लांबच लांब भेगा पडल्या आहेत .काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तर काही फुलांवरील लोखंडी जाळ्या उघड्या पडलेल्या आहेत .

रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुचाकी वाहनांची मोठी तारांबळ उडत आहे .समोरून येणाऱ्या वाहनांचा डोळ्यावर पडणारा प्रकाश आणि खाली रस्त्यावर असणाऱ्या मोठ्या भेगा यावरून प्रवास करताना या कारणामुळे अनेक अपघातही या रस्त्यावर झाले आहे .

         नवीन तयार झालेला हा रस्ता प्रवाशांसाठी आता धोक्याची घंटा बनत आहे .काही ठिकाणी रस्त्यावर आलेले काटेरी झुडपे, पुलांवरील उघड्या झालेल्या लोखंडी जाळ्या, रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगा आणि खड्डे यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे नागरिक व प्रवासी यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे .शासनाने या रस्त्याविषयी गंभीर दखल घेऊन व सखोल चौकशी करून संबंधित इंजिनियर व ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरीक करत आहेत .