शिवांकुर विद्यालयास आदर्श विद्यालय तर मुख्याध्यापिका छाया जाधव यांना विद्याविभुषण पुरस्कार प्रदान .

*शिवांकुर विद्यालयास आदर्श विद्यालय तर मुख्याध्यापिका छाया जाधव यांना विद्या विभुषण पुरस्कार प्रदान...*
आहिल्यानगर येथे Rotary club of Ahmednagar Integrity च्या वतीने रोटरी ज्ञान गौरव पुरस्कार सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख उपस्थिती मॅनेजिंग कौन्सिल सदस्या, रयत शिक्षण संस्था सातारा च्या सदस्या श्रीमती मीनाताई माणिकराव जगधने या होत्या, तर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी सह शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथ.)भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातुन शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक तसेच रोटरी अहमदनगरचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण जिल्ह्यातील विद्यालय व त्यांचे प्रतिनिधी यांच्या मधून आदर्श विद्यालय व विद्या विभुषण पुरस्कार २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राहुरी येथील नामांकित शिवांकुर विद्यालय, कोंढवडला आदर्श विद्यालय तर आदर्श शिक्षकांसाठी असलेला विद्या विभुषण पुरस्कार- विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव यांना मिळाला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव डॉ प्रकाश पवार तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच जी.बी औटीसर, माजी प्रशासन अधिकारी लक्ष्मणराव गुळवे यांनी विद्यालयाचे व मुख्याध्यापिका यांचे अभिनंदन केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून विद्यालय व मुख्याध्यापिका छाया जाधव यांचे अभिनंदन होत आहे.