राज्यस्तरीय डॉ . सी . व्ही . रमण बालवैज्ञानिक परीक्षेचा निकाल जाहीर, आयुष टेकाळे, अनुष्का तनपुरे, श्रुती बोडके, विराज सुरवसे, साईराज कोपनर, रामन रेड्डी राज्यात प्रथम .
राज्यस्तरीय डॉ.सी. व्ही .रमण बालवैज्ञानिक परीक्षेचा निकाल जाहीर
आयुष टेकाळे, अनुष्का तनपुरे, श्रुती बोडके , विराज सुरवसे,साईराज कोपनर, रामन रेड्डी राज्यात प्रथम
राहुरी:-जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचलित राज्यस्तरीय डॉ.सी.व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेची निकाल नुकताच जाहीर झाला आहे. परीक्षा इयत्ता पाचवी ते नववी या वर्गाकरिता घेतली जाते .राज्य जिल्हा व तालुकास्तर गुणवत्ता यादीतील पात्र असणाऱ्य बालवैज्ञानिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते.यावर्षी राज्यातील तीस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
राज्यस्तरीय गुणवत्त यादीत इयत्ता पाचवीचा एस के सोमय्या प्राथमिक शाळा श्रीरामपूरचा आयुष टेकाळे व भारती पब्लिक स्कूल कर्जतची कुमारी अनुष्का तनपुरे यांनी इयत्ता पाचवीच्या राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला इयत्ता सहावीच्या राज्य गुणवत्ता यादीत रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगावची कुमारी श्रुती बोडके व भारती पब्लिक स्कूल कर्जत चा विराज सुरवसे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.इयत्ता सातवी मध्ये श्रीयोगेश्वरी नूतन विद्यालय आंबेजोगाई चा रामन रेडडी या विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.इयत्ता आठवी मध्येकोटा मेंटर्स प्रायमरी सेकंडरी अँड हायर सेकंडरी विद्यालय कर्जत चा साईराज कोपणार याने राज्यात प्रथम क्रमांक पटकवला.
इयत्ता नववी मध्ये बालशिवाजी माध्यमिक शाळा जठार पेठ जिल्हा अकोला येथील विद्यार्थिनी समृद्धी काळंके हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकवला.इयत्ता पाचवी ते नववी तील राज्य यादीत चाळीस जिल्हा यादीत एकशे एकोन्नवद तालुका गुणवत्ता यादीत आठशे नव्वान्नव या प्रमाणे एकूण अकराशे अठ्ठावीस बाल वैज्ञानिक कार्यशाळेसाठी पात्र ठरले आहेत.
राज्य जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीतील बालवैज्ञानिकांसाठी दरवर्षी जुलै महिन्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले जाते. कार्यशाळेत नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून गुणवत्ता धारक बालवैज्ञानिकांना गौरवण्यात येते. विद्यार्थ्यांना मेडल ,सन्मानपत्र व नाविन्यपूर्ण बक्षिसे दिले जातात यामध्ये दुर्बीण ,सोलारकार ,रोबोटिक्स, मायक्रोस्कोप , जनरेटर यासारख्या अनेक सायन्स किट बक्षीस स्वरूपात दिल्या जातात.विद्यार्थ्याना विज्ञानातील संकल्पना स्पष्ट होण्याकरीता या किटचा उपयोग करतात.अशी माहिती उपक्रम प्रमुख अरुण तुपविहिरे यांनी दिली
तसेच जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्यातर्फे राज्य जिल्हा व तालुका स्तर गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्याकरिता इस्रो सहलीचे व आयोजन विमानाने केले जाते थुंबा केरळ व श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट प्रेक्षपण पाहण्याची संधी बालवैज्ञानिकांना उपलब्ध करून दिली जाते.अशी माहिती सहलप्रमुख संकेत जाधव यांनी दिली.