सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा,3000 विद्यार्थ्यांनी घेतला योग व प्राणायामचा आनंद ,योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहून एकाग्रता व बौद्धिक क्षमतेत होते वाढ - डॉ . एन . सी . गौतम

सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा,3000 विद्यार्थ्यांनी घेतला योग व प्राणायामचा आनंद ,योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहून एकाग्रता व बौद्धिक क्षमतेत होते वाढ - डॉ . एन . सी . गौतम

सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा:-

 

           आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले प्राथमिक ,माध्यमिक विद्यालय व इंग्लिश मीडियम च्या सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी योग व प्राणायाम केले .याप्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ महानंद माने यांनी प्रास्ताविकात पाहुण्यांचे स्वागत करून सर्वांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

           कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एन. सी.गौतम ,महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकन समितीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय , चित्रकुट ,सटना (मध्यप्रदेश) यांनी योगाचे विद्यार्थी जीवनातील अनन्यसाधारण महत्व सांगताना शरीर व मन यांचे उत्तम संतुलन ठेवून निरामय जीवनशैलीसाठी योग व प्राणायामावर आधारीत प्राचीन भारतीय जीवनशैली ही सर्वोतम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अंगिकार केल्यास त्यांचे शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम राहून त्यांची एकाग्रता व बौद्धिक क्षमतेत देखील वाढ होते असे प्रतिपादन केले.

      योगशिक्षक रवींद्र आंधळे यांनी विविध योग व प्राणायाम प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले.संस्थेच्या तीनही विद्यालयातील इयत्ता चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे दाद देत योग व प्राणायाम केले.प्रा.जितेंद्र मेटकर यांनी आभार मानले.

         आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे ,उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे ,क्रीडाशिक्षक घनश्याम सानप ,एनसीसी ऑफिसर संतोष जाधव यांनी केले . विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले .