शिवांकुर विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

शिवांकुर विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

*शिवांकुर विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* 

           शिवांकुर विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय सेनादलातील सेवानिवृत्त मेजर शरद खडके व निकेश ढोकणे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

             *राष्ट्र सेवा ही सर्वोच्च सेवा आहे प्रत्येकाने आपल्या कार्यातून राष्ट्रसेवा केली पाहिजे आपल्या देशासाठी त्याग केला पाहिजे असे प्रतिपादन मेजर शरद खडके यांनी केले.* 

             याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे व विद्यार्थी शिक्षक यांनी ध्वजारोहणाला मानवंदना दिली. प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे तसेच कवायत संचलन, विद्यार्थी संचलन व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

           विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉ नरेंद्र इंगळे हे होते. त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम व कलाकृती यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या वतीने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास

          संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, जी. बी औटी सर, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार, सौ मंगल ताई पवार, ज्योतीताई शेळके यांची उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली धोंडे,साक्षी शिंदे व आभार प्रियंका पांढरे यांनी केले. शिवांकुर ग्रुपच्या राहुरी येथील शिवांकुर रेन्बो स्कूल चे सर्व विद्यार्थी तसेच पालक देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांनी देखील भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांना शिक्षिका कावेरी तनपुरे, वनिता भुजाडी, रितू चाकोते, रूपाली मेहत्रे आदींनी मार्गदर्शन केले.

             या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे व लिपिक अर्चना पाळंदे, शिपाई शारदा तमनर आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

           शिवांकुर ग्रुपच्या शिवांकुर विस्डम स्कूल खडांबे खुर्द येथे देखील भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.