६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बारागाव नांदूर येथे महामानवास अभिवादन.

६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बारागाव नांदूर येथे महामानवास अभिवादन.

राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका उपाध्यक्ष सलिमभाई शेख , रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव , रिपब्लिकन सेनेचे तालुकाप्रमुख विनोद पवार, एकलव्य बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गवराज माळी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष कैलास पवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर मेणबत्ती व अगरबत्ती खोलेश्वर दुध संघाचे व्हायचेअरमन सुभाष पवार,बारागांव नांदूर ग्रामपंचायत मा.सदस्य पोपट पवार मा उपसरपंच गौतम पवार , राजुभाई इनामदार सामाजिक कार्यकर्ते चांदभाई शेख यांनी प्रज्वलित केली, यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा बौद्धाचार्य चंद्रकांत जाधव यांनी त्रिशरण पंचशील व भिमस्मरण भिमस्तुती आपल्या पहाडी आवाजात गाऊन धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी माजी उपसरपंच गौतम पवार,सलीम भाई शेख , कैलास पवार, गवराज माळी बार्टी संस्थेचे समता दुत इजाजभाई पिरजादे यांची भाषणे झाली याप्रसंगी विलास पवार, उत्तम पवार, निलेश पवार ,आकाश क्षिरसागर ,नाना पवार ,दादाभाई शेख सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते