त्रिमूर्ती महिला विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह संपन्न.
त्रिमूर्ती महिला विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह संपन्न
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,
शेवगाव: त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित,त्रिमूर्ती महिला विज्ञान महाविद्यालय शेवगांव येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह अंतर्गत उद्देश व अंमलबजावणी अनुषंगाने व्याख्यान माला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख व्याख्याते शिक्षण विभाग पं.स.शेवगांव चे विषय तज्ञ मार्गदर्शक सन्माननीय त्र्यंबकराव फापाळ साहेब व मान्यवरांचे त्रिमूर्ती महिला विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सरिता जगताप मॅडम यांनी स्वागत केले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगांव चे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे सर तर प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते श्री. त्र्यंबकराव फापाळ साहेब,त्रिमूर्ती पब्लिक स्कूल प्राचार्य श्रीमंत काळे सर, मुख्य सैनिकी प्रशिक्षक मेजर तुकाराम धनवटे सर,पालक प्रतिनिधी जनार्दन घुगे,राजेंद्र बळे,विभाग प्रमुख प्रा ज्ञानेश्वर खरड,प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व द्विपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विक्रांत व्यवहारे सर यांनी केले.विद्यार्थीनी प्रतिनिधी सायली घुगे तसेच प्राचार्य श्रीमंत काळे, प्राचार्या श्रीम सरिता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख व्याख्याते सन्माननीय त्र्यंबकराव फापाळ साहेब यांनी आपल्या व्याख्यानातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,उद्देश,अमुलाग्र बदल व अंमलबजावणी संदर्भात रचनात्मक मार्गदर्शन केले.शेवटी अध्यक्षिय मनोगतात बाळासाहेब कोकरे सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव काळे सर यांनी केले तर उपस्थितांचे प्रमोद बाबर सर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांग
ता झाली.