रिपाईच्या जिल्हा शिक्षक आघाडी अध्यक्ष पदावर अनुसंगम शिंदे यांची नियुक्ती.
राहुरी केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाजभूषण ना.रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(शिक्षक आघाडी) च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदावर राहुरी शहरातील,रयत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक अनुसंगम शिंदे सरांची निवड करण्यात आली.
शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेत निरनिराळ्या शाखांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून ३३ वर्षे सेवा केली आहे.शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची त्यांना जाण असून शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना संस्था व शासनाकडून होणाऱ्या त्रासास ते आपल्या पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करतील या भावनेतून त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात,राज्य संघटक गोविंदमामा दिवे,जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगीळे,पप्पू बनसोडे,मुस्लिम अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुबभाई शेख यांच्या उपस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
त्यांच्या निवडीबद्दल रिपाइं राहुरी तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविण लोखंडे, वंचितचे तालुका उपाध्यक्ष नविन साळवे,अरुण साळवे,विवेक सगळगीळे,सागर साळवे,संतोष दाभाडे, राजू बागुल,रोहन शिंदे,बाळासाहेब म्हसे,भूषण साळवे,वंचितचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार,सुनिल चांदणे,भीमतेज चे अध्यक्ष अतुल त्रिभुवन, रविंद्र शिरसाठ,राजू दाभाडे,बाबा साठे,निसारभाई सय्यद आदींनी अभिनंदन केले.