जालना लाठी हल्ला निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे राहुरी तहसिलदारांना निवेदन.

आरआर जाधव प्रतिनिधी
जालना येथे झालेल्या लाठीहल्ला निषेदार्थ शिवसेना ठाकरे गटाचे अहमदनगर जिल्हा दक्षाण चे सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे नाना व पदाधीकारी यांनी राहुरीचे तहसीलदार राजपूत साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे कि मराठा आरक्षण मिळणेसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली (सराटी ) या ठीकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते त्यांचे उपोषण शांततेच्या मार्गाने चालु असताना त्यांना पोलीसांनी उपोषणा पासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता उपोषणार्थी व पोलिसात शाब्दीक चकमक झाली त्याचा परीणाम म्हणुन पोलीसांनी अंदोलकांवर अमानुष पणे लाठीहल्ला केला अश्रु धुर सोडून अंदाधुंदपणे हवेत गोळीबार करून लहाण मुले q महीलांना जबर जखमी केले सदर उपोषणार्थी हे पोलीसांना पुर्ण सहकार्य करत असताना जाणीव पुर्वक मराठा समाजाचे आरक्षण उधळून लावणेसाठी हा लाठीचार्ज व गोळीबार घडवून आणला असुन अहमदनगर जिल्हा शिवसेना जाहीर निषेध करत आहे या घटनेची जबाबदारी स्विकारून राज्याचे गृहमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत राजीनामा द्यावा आणी लवकरात लवकर मराठा समाजास आरक्षण द्यावे अन्यथा कोणत्याही क्षणी तिव्र स्वरूपाचे अंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता घ्यावी असा इशाराही चा निवेदना द्वारे देण्यात आला
रावसाहेब खेवरे , डॉ सजय म्हसे , सचिन म्हसे , बाबासाहेब मुसमाडे संजय येवले इश्वर कुसमुडे विजय सिरसाठ विलास जाधव रोहन भुजाडी दत्तु गागरे धनंजय आढाव सुनिल शेलार कैलास कोहकडे धनंजय गागरे नाना कुसमुडे पोपट शिरसाठ विलास ढोकणे कैलास अडसुरे सयाजी श्रीराम नाना करमड राजेद्र सातभाई कैलास शेळके फौजी घुगरकर सदीप आढाव ठकसेन हारदे इत्यादी कार्यकर्त्याच्या सह्या असुन या निवेदनाच्या प्रती मा मुख्यमंत्री मा गृहमंत्री मा पालकमंत्री मा. जिल्हाधिकारी मा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवीण्यात आल्या आहेत.