‘ अल्पवयीन मुलीस आत्महत्या करण्याची धमकी देऊन पळून नेऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा '

‘ अल्पवयीन मुलीस आत्महत्या करण्याची धमकी देऊन पळून नेऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा '

अहमदनगर : आरोपी नामे शिवाजी भाऊराव सुर्यवंशी , वय - ३७ वर्षे , रा . ब्राम्हणी ता . राहुरी . जि . अहमदनगर याने १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तसेच आत्महत्या करण्याची धमकी देवून तिला पळून नेवून तिचेवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३७६,३७६ ( २ ) ( एन ) ३७६ ( ३ ) , ३६३,३६६ ( अ ) , ३२३,५०४,५०६ तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ४,६,८,१२ नुसार दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ ( ३ ) नुसार २० वर्षे सक्त मजुरी व रूपये २,००० / - दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैद , भा.द.वि. कलम ३६६ ( अ ) नुसार २ वर्षे सक्त मजुरी व १,००० / - दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद , भा.द.वि. कलम ५०६ नुसार ६ महिने सक्त मजुरी व दंड रूपये ५०० / - दंड न भरल्यास ८ दिवस साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक १६.११.२०२१ चे रात्री पिडीत मुलगी हिस अज्ञात व्यक्तीने पळून घेवून गेल्याची फिर्यादी पिडीत मुलीच्या काकाने राहुरी पोलिस स्टेशनला दिली . सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर राहुरी पोलिसांनी भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदविला . प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच सहा . फौजदार सी . एन . ब - हाटे • यांनी केला . तपासाचे दरम्यान पिडीत मुलगी ही मिळुन आली . तिचेकडे पोलिसांनी चौकशी केली असता , तीने सांगितले की , ती आरोपी नामे शिवाजी सुर्यवंशी याला २०१ ९ पासून ओळखत होती . आरोपी याचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले आहेत . पिडीत मुलगी ही शेतात काम करत असताना तसेच इतर वेळेस कोणीही नसताना आरोपी हा तिचे जवळ येत असे व तिचेशी बोलण्याचा प्रयत्न करत असे . तसेच आरोपीने पिडीत मुलीस बळजबरीने मोबाईल देवून तिचेशी बोलत असे . त्यानंतर आरोपीने पिडीत मुलीला धमकी दिली की , जर तु माझेशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेल व तुझे व तुझ्या आईवडीलांचे नाव चिठ्ठीमध्ये लिहून ठेवून . त्यामुळे पिडीत मुलगीही घाबरून गेली व पिडीत ही आरोपीशी बोलू लागली . दिनांक १५.११.२०२१ रोजी आरोपीने पिडीत मुलीला घराचे बाहेर भेटायला बोलावले व आपण दोघे पळून जावून लग्न करू असे म्हणाला . त्यावेळी पिडीत मुलगी नाही म्हणाला असता आरोपीने तिच्या आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली व स्वतः विष पिऊन

आत्महत्या करेल असे म्हणाला . त्यानंतर दिनांक १७.११.२०२१ रोजी पहाटे २ वाजणेच्या सुमारास आरोपीने दिलेल्या धमकीमुळे पिडीत मुलगी घाबरून जावून आरोपी सोबत • मोटारसायकलवर करमाळा सोलापूर येथे गेले . करमाळा येथे एका शेतामधील कोपीमध्ये आरोपीने पिडीत मुलीला ठेवले . आरोपीने दिनांक १७.११.२०२१ ते १२.१२.२०२१ पावेतो पिडीत मुलीवर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले याबाबतचा जबाब पिडीत मुलीने राहुरी पोलिसांसमोर दिला , घटनेचा तपास पूर्ण करून पोलिस उप निरीक्षक निरीज बोकील यांनी मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीतेचे काका , पंच साक्षीदार तपासी अधिकारी यासंदर्भात मुख्याध्यापक , ग्रामसेवक व वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की , सदरच्या घटनेमधील आरोपी हा विवाहित असून त्यास मुले आहेत तसेच आरोपीचा एक मुलगा व पिडीत मुलगी हे एकाच वयाचे होते . आरोपी हा विवाहीत असून देखील हा पिडीत अल्पवयीन मुलीस आत्महत्या करण्याची धमकी देवून पळवून घेवून गेला . वास्तविक पाहता , सदर केसमधील पिडीत मुलगी ही १३ वर्षे वयाची होती . आरोपीने दिलेल्या धमकीमुळे ती पुर्णपणे घाबरून गेलेली होती . आरोपी विवाहित असून तिला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले . वास्तविक पाहता , आरोपीचे लग्न झाले असल्याने पिडीत मुलीला पळवून घेवून जाणे यामागे आरोपीचा पिडीत मुलीचा लैगिंक शोषण करणे हा एकमेव उद्देश होता . त्यामुळे या केसमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत . सदरच्या केसमध्ये आरोपीस आज महिला दिनाचे दिवशी २० वर्षे शिक्षा मे . कोर्टाने दिलेली आहे . त्यामुळे या शिक्षेला जास्त महत्व प्राप्त झालेले आहे . सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व केस मध्ये झालेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ , तसेच पो.कॉ. पठारे व पो.कॉ. वाघ यांनी सहकार्य केले . 

अहमदनगर ता . ०८/०३/२०२३ 

( ॲड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )

 विशेष सरकारी वकील , अहमदनगर .

 मो . ९ ८५०८६०४११,

८२०८ ९९ ६७ ९ ५ .