पिंप्री अवघड ग्रामपंचायत मध्ये प्रहार चे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांच्या हस्ते दिव्यांगांना संसारोपयोगी वस्तू व चेकचे वाटप .
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगांना निधी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .महाराष्ट्र शासनाच्या जीआर प्रमाणे ग्रामपंचायत उत्पन्नाच्या ५% निधीचे वाटप करणे हे प्रत्येक ग्रामपंचायतला बंधनकारक असते . या नियमानुसार आज पिंप्री अवघड मध्ये गावातील सर्व अपंग बांधवांना ग्रामपंचायत मध्ये एकत्रित करून प्रहारचे तालुकाध्यक्ष तसेच पिंप्री अवघड चे माजी सरपंच सुरेशराव लांबे यांच्या हस्ते या निधीचे वाटप करण्यात आले .यावेळी सुमारे १७ लाभार्थ्यांनी या निधीचा लाभ घेतला .तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांनी आपआपल्या गावामध्ये दिव्यांगांना निधी वाटप करून मदत करावी असा मोलाचा सल्ला सुरेशराव लांबे यांनी यावेळी दिला .
या कार्यक्रमासाठी पिंप्री अवघड चे सरपंच सौ .रेखाताई पटारे ,उपसरपंच लहानु तमनर ,ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड ,शरद लांबे, ग्रामसचिव शुभांगी चोखर ,ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा कांबळे ,संजय वाघमारे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते .