तालुक्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना,हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वर पोलिसांचा छापा.
प्रतिनिधी नेवासा
नेवासा फाट्यावरील तीन प्रतिष्ठित लॉजिंग वर रात्री पोलिसांची धा ड पडल्यानंतर सात महिलांसह पुरुषाला ताब्यात घेण्यात आले रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते
नेवासा फाटा येथे गेले अनेक दिवस अवध्य वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे चर्चा होती प्रतिष्ठित हॉटेल व्यवसायाच्या आड चालणारा हा वेश्याव्यवसाय आज संध्याकाळी पुढे आला
पोलिस अधीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. नेवासा, श्रीरामपूर शेवगाव, येथील पोलिस निरीक्षक, सुमारे २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता. या कारवाईत सात मुलीस ताब्यात घेण्यात आले.
हॉटेल तिरंगा येथून तीन मुली, हॉटेल नामगंगा येथून तीन मुली तर हॉटेल पायलमधून एका मुलीना ताब्यात घेण्यात आले.