ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या विरंगुळा निवासस्थानी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट

ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या विरंगुळा निवासस्थानी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट

:

ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या विरंगुळा निवासस्थानी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट

अहिल्यानगर प्रतिनिधी ///

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यानगर येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या 'विरंगुळा' निवासस्थानी सदिच्छा भेट देत विविध सामाजिक, साहित्यिक आणि समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीत सार्वजनिक जीवनातील अनुभव, समाजकारण, ग्रामीण विकास आणि वर्तमान घडामोडींवर सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली.

यावेळी प्रा. राम शिंदे यांनी यशवंतराव गडाख यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचा गौरवपूर्ण उल्लेख करत, समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य आणि विविध क्षेत्रांतील योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या समृद्ध अनुभवांतून अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी यशवंतराव गडाख आणि उद्योजक विजयराव गडाख यांच्या हस्ते प्रा. राम शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गडाख कुटुंबीयांनी त्यांचे आत्मीयतेने स्वागत करून सन्मान केला.भेटीदरम्यान साहित्य, सामाजिक बांधिलकी, ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण आणि बदलत्या काळातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाल्याने ही सदिच्छा भेट संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.