सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व इंग्लिश मीडियम विद्यालयाच्या संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन मोठ्या उत्साहात संपन्न.

सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व इंग्लिश मीडियम विद्यालयाच्या संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन मोठ्या उत्साहात संपन्न.

 अहिल्यानगर प्रतिनिधी : - सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व इंग्लिश मीडियम विद्यालयाचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .डॉक्टर विलास जी खर्चे कुलगुरू तथा अध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ म. फु. कृ.वी .राहुरी. तसेच मा.डॉक्टर महानंदजी माने सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे तथा सचिव सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ उपस्थित होते. संस्थेचे सभापती मा .डॉक्टर प्रमोद रसाळ तसेच गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राहुरी मा .श्री. मोहिनीराज तुंबारे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध व्याख्याते मा .श्री .गणेश शिंदे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ मा .श्री संतोष धोत्रे उपस्थित होते. मा .श्री संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन उपस्थित होते .

       सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा श्री अरुण तुपविहीरे ,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक. श्री .बाळासाहेब खेत्री ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती .योगिता आठरे ,माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक श्री मनोज बावा उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे अध्यापक प्रतिनिधी म्हणून श्री. संतोष जाधव, मा. श्री प्रतिनिधी गोरक्ष उचाळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री भानुदास आढाव ,श्री गोरक्षनाथ वर्पे, श्रीमती अनिता वाघमारे उपस्थित होते .त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी चिरंजीव सुयश हराळे ,कुमारी. कार्तिकी सोनवणे, चि. स्वानंद भुते कुमारी आरोही पानसंबळ, चि. आरोग्य सम्राट मसे , कुमारी अवंती कल्हापुरे, चि. ओम धनवडे कुमारी .श्रद्धा कोतकर ,चि. विनोद गावडे कुमारी प्रज्ञा चंदनशिव इत्यादी उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थितांचे, मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पाहुण्यांचा परिचय करून दिला .माजी विद्यार्थी श्री संतोष धोत्रे यांनी भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना उदबोधित केले. 

         कार्यक्रमाला लाभलेले संस्थेचे सचिव संस्थेचे मा. श्री महानंद जी माने यांनी देखील विद्यार्थ्यांना खचून न जाता चिकाटीने प्रयत्न करून यश मिळवा अशाप्रकारे विद्यार्थ्यांना उपकृत केले. अध्यक्ष भाषणामध्ये आदरणीय श्री विलास जी खर्चे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेऊन आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिवस घोषित झाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री .गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्ट्रेंथ विकनेस ओळखून कौशल्य आत्मसात केली पाहिजे .अंधा नंदीकरण करू नये दुसऱ्याच्या अनुकरण करू नये हो हो मध्ये हो मिसळू नये योग्य ठिकाणी नाही म्हणायचे धाडस दाखवा मुलांना तुमच्या तुमच्या नावाने तुमच्या पालकांची ओळख झाली पाहिजे .तुमच्याकडे बघून तुमच्या पालकांना हवेत जाता आले पाहिजे आहे .आईच्या स्पर्शाची जागा आता मोबाईल ने घेतली आहे याला जबाबदार कोण चांगल्या मुलांची संगत ठेवा यावर भविष्य ठरणार आहे .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले तुमच्यातले वेगळेपण ओळखा .संभाजी महाराज ,सचिन तेंडुलकर ,उस्ताद खा साहेब यांचे विविध उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले गुणपत्रिकेला आलेली सूज यश ठरवत नाही व्यवसायला प्राधान्य द्या जगाची बदलती भाषा शिकली पाहिजे काळानुसार झालेले बदल स्वीकारता आले पाहिजे शेवटी 'काय सांगू राणी मला गाव सुटेना...' या गीताने शेवट केला यानंतर वर्षभरातील शालेय उपक्रम विविध स्तरावरील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळातर्फे दिले जाणारे गोपनीय पुरस्कार सावित्री कन्या सावित्री पुत्र विद्यार्थी प्रिय शिक्षक शिक्षिका गरीब होतकर विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू निसर्गप्रेमी विद्यार्थी एनसीसी आणि त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी गुणवंत विद्यार्थी आदी पुरस्कार देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा टेमकर व श्री. संदीप कुंभारे यांनी करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली कार्यक्रमाचे आभार विद्यालयच्या उपमुख्याध्यापक श्री .बाळासाहेब डोंगरे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते मोठ्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला