भारतभरातून आलेल्या संत महंतांच्या उपस्थित गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराधिकारी सोहळा संपन्न.

भारतभरातून आलेल्या संत महंतांच्या उपस्थित गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराधिकारी सोहळा संपन्न.

संपूर्ण विश्वाचे आराध्य भूलोकी स्वर्ग अवतरला असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र देवगड.

             आणि याच पावन भूमीत बालसन्यासी गुरुवर्य किसनगिरी बाबा यांनी गुरुपरंपरेचे जे रोपटे लावले होते ते आज बहरून आले आहे, किसंगिरी बाबा यांनी दिलेला वारसा गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी अविरत चालू ठेवला व गुरु परंपरेनुसार भास्कर गिरी महाराजांनी आपल्या शिष्याची नियुक्ती केली उत्तराधिकारी म्हणून ते म्हणजे कृष्णा महाराज मते यांची आज कृष्णा महाराज मते नसून त्यांनी संन्यासी दीक्षा घेतलेली आहे, त्यात त्यांचा पुनर्जन्म झालेला आहे व त्यांना गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांनी प्रकाशनंदगिरी जी महाराज हे नामकरण केले.

        देवगड देवस्थान चे उत्तराधिकारी म्हणून .

       नियुक्ती झाल्यानंतर महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज म्हणाले की मी उत्तराधिकारी नसून उत्तर सेवक म्हणून या मिळालेल्या संधीचं गुरुवर्य भास्करगिरी बाबाजींच्या प्रेरणेने नक्कीच सोनं करील.

      गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला या देहात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तडा जाऊ देणार नाही.

     बाबाजींना जे प्रेम सर्व भाविक भक्तांनी दिलेल्या आहे तसाच कृपाशीर्वाद माझ्यावरही राहो .

                 कायदेशीर रित्या नोंदणी करून प्रकाशनंदगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून रजिस्ट्रेशन झाले. 

                यावेळी हरिभक्त परायण कैलास गिरी महाराज यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होतै . या कीर्तन सेवेचा लाखो भाविकांनी लाभ घेतला. गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई पाटील, त्याचप्रमाणे प्रकाशनंदगिरी महाराज यांचे पिता व मातोश्री किर्तन श्रवण करण्यासाठी उपस्थित होते.

         भारतभरातून आलेल्या संत महंत यांनी नवनियुक्त उत्तराधिकारी यांना पंच संस्कार दीक्षा व आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे त्यांना पाच वस्तू भेट दिल्या.

     श्री दत्त संस्थान देवगड यांच्या वतीने साधू संन्यासी यांच्यासाठी संत भोजनाची विशेष व्यवस्था केली होती.

              यावेळी राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते,

          गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या बद्दल बोलताना संत महंत यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. बाबाजी एखाद्या इंजिनियर पेक्षाही कुशल आहेत. त्यांच्या विचारसरणीला कौशल्याला तोड नाही. बाबाजींचे नियोजन म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रेयांचे नियोजन असते. अशा शब्दात जुनागड आकड्याचे महंत यांनी बाबाजींचा गौरव केला.

                महाराष्ट्रातून इतके सारे आमदार खासदार असताना अनेक संत महंत असताना राम मंदिर भूमिपूजनासाठी गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. स्वतः राम लल्लांनी बाबाजींना आमंत्रित केले होते असे म्हणावे

लागेल.