मुलीच्या अपहरणाचा तपास पोलीस करेनात. .! ! मुलीच्या आई - वडिलांचा उपोषणाला बसण्याचा इशारा ...! !

मुलीच्या अपहरणाचा तपास पोलीस करेनात. .! ! मुलीच्या आई - वडिलांचा उपोषणाला बसण्याचा इशारा ...! !

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी 12 फेब्रुवारी पासून बेपत्ता झाली आहे. संबंधित कुटुंबाने याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. परंतु तीन महिने उलटून देखील पोलिसांना सदर बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेतलेला नाही. त्यामुळे तपासी अधिकारी यांच्याकडून तो  तपास काढून तो इतर कर्तव्यदक्ष अधिकार्‍याकडे हस्तांतरित करण्याची मागणी अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबाने केली आहे.  तसेच मुलीच्या शोधासाठी पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा निषेधार्थ मुलीच्या या कुटुंबीयांनी  दि.१४ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.  अशोकनगर येथील अपहत मुलीचे कुटुंब गरीब परिस्थित असून तिचे वडील रिक्षा चालवतात गेल्या तीन महिन्यापासून सदरचे कुटुंब पोलीस ठाण्यात मुलीच्या शोधासाठी चकरा मारत आहेत.  मात्र पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा या मागणी करिता कोम्ब्रेड  श्रीकृष्ण बडाख कोम्ब्रेड जीवन सुरडे आणि अँड समीर बागवान यांनी निवेदनाद्वारे मुलीच्या तपासाची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठविले असून सदर मुलीचा शोध घेण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास करण्या कामी तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे चार्ज देण्यात  आलेला आहे. सदरच्या मुलीचे अपहरण झाल्यानंतर तपासासाठी पोलिसांना वारंवार विनंत्या करण्यासाठी कुटुंब गेले असता तपास करणारे पोलीसच सदरच्या कुटुंबाला दबावाखाली घेत आहेत दोन महिन्यानंतर मुलीचे वडील व नातेवाईक हे स्वतः पोलिसांबरोबर पुणे येथील शिवाजीनगर परिसरात मुलीचा शोध घेण्यासाठी गेले परंतु पोलिसांनी चौकशीचा फार्स करून तशी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नोंद केली मुलीचा कोणताही शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही.  मात्र पीडित कुटुंब पोलिसांकडे विचारना करण्यासाठी गेले असता अरेरावीची भाषा पोलीस वापरतात सदर प्रकरणातील अपहरण केलेल्या मुलीचा तातडीने शोध घेऊन पिडीत कुटुंबाला न्याय न दिल्यास पोलिस प्रशासनाच्या विरोधात शहरातील महात्मा गांधी स्मारकासमोर दिनांक 14 मे रोजी अपहरण झालेले पीडित कुटुंबीय उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कॉम्रेड श्रीकृष्ण बडाख कॉम्रेड जीवन सुरडे अँडवोकेट व अँडवोकेट्स बागवान यांनी निवेदनाद्वारे दिला आहे