नेवासा तालुक्यात प्रथमच श्रीराम साधना आश्रम येथे श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगची स्थापना होणार..

नेवासा तालुक्यात प्रथमच श्रीराम साधना आश्रम येथे श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगची स्थापना होणार..

नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर येथिल श्रीराम साधना आश्रम येथे श्रावण मास पहिला सोमवार निमित्त प्रभू रामचंद्राच्या व प. पु. ब्रह्मलीन योगिराज प्रल्हादगिरी महाराज तसेच ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी प्रकाशगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व गुरूवर्य ह भ प भास्करगिरी महाराज यांचे प्रेरणेने व महंत सुनील गिरी महाराज यांच्या मार्गदर्शाखाली अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात प्रथम १२ ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा व महापूजा होणार आहे.

          या निमित्ताने सोमवार सकाळी १० ते १२ या वेळात ह भ प अमोल महाराज घाडगे (तेलकुडगाव) यांचे हरी किर्तन होणार आहे. तद्नंतर महाआरती व महाप्रसाद ( फराळ) होईल. फराळाचे अन्नदाते चि. शिवम महेंद्र कानडे आहेत.

      नेवासा तालुक्यात प्रथमच बारा ज्योतिर्लिंग ची स्थापना होणार असून भाविकांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे. अशी विनंती श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांनी केली आहे.