प्रा . डॉ.महावीरसिंग चौहान यांची राज्यपाल संचलित राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या (अश्वमेध )वित्त उपसमितीमध्ये सदस्यपदी निवड .
*प्रा.डाॅ. महावीरसिंग चौहान यांची राज्यपाल संचलित राज्य क्रिडामहोत्सव स्पर्धैच्या ( अश्वमेध) वित्त उपसमितीमध्ये सदस्य म्हणून निवड*
महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी येथील प्राध्यापक तथा संचालक राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण डॉ. महावीरसिंग रामचरण चौहान यांची राज्यपाल संचलित राजभवन महाराष्ट्र राज्य मुंबई येथून गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली येथे 10-15 जुलै 2024 या कालावधीत होणा-या राज्यस्तरीय (अश्वमेध) क्रिडामहोत्सव स्पर्धेच्या वित्त उपसमितीत सदस्य म्हणून निवड झाली आहे. या आधी राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य 2022 चे प्रा . डाॅ . महावीरसिंग चौहान विद्यापिठाचे सदस्य सचिव होते . विद्यापिठाचे सन्माननिय कुलगरू डाॅ . पी.जी.पाटील यांच्या नेतृत्वातून मार्गदर्शनातून व पाठींब्यातून त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने इंद्रधनुष्य यशस्वी करून दाखवला होता . त्या कार्याची दखल घेऊन राज्पालभवनाने त्यांची सदरील निवड केली आहे.
या निवडीमुळे विद्यापिठाचे कुलगुरू डाॅ पी.जी.पाटील कुलसचिव श्री .मुकूंद शिंदे , विद्यापिठातील सर्व उच्च अधिकारी कर्मचा-यांनी तसेच राहुरी तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून डाॅ . महावीरसिंग चौहान यांचे अभिनंदन केले आहे.