तीन मित्र पोहण्यासाठी गेले असता एकाचा बुडून म्रुत्यू तर एकाला वाचविण्यात एका मित्राला यश. .. !!!
श्रीरामपूर :: -- श्रीरामपूर शहरा लगत असणाऱ्या टाकळीभान या ठिकाणी असणाऱ्या टेलटॅंक या ठिकाणी वाढत्या उन्हामुळे अनेक जण पोहण्याचा आनंद घेत असतात.वाढत्या उष्म्याने अंगाची काहीली होत असल्याने टाकळीभान टेलटँकमध्ये मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पोहोता येत नसतानाही गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना टाकळीभान या परिसरात घडली.या घटनेमध्ये सुदैवाने आणखी एका मित्राला वाचवण्यात बुडालेल्या तिसऱ्या मित्राला यश आले.
टाकळीभान लगत असणाऱ्या टेलटँकमध्ये सुमारे आत्तापर्यंत 65% पाणीसाठा उपलब्ध आहे. वातावरणात उष्णता वाढल्याने टेलटैंक मध्ये उन्हात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरीक व मुले दररोज या ठिकाणी येत असतात. असेच पोहण्याकरता रविवारी दुपारी टाकळीभान येथील स्वराज सुरेश कोकणे (वय- 18) हा तरुण आपल्या दोन मित्रांसोबत टेलटँकवर गेला होता. स्वराज व त्याचा एक मित्र पोहता येत नसल्याने हे दोघे पोहणे शिकत होते.तर तिसरा मित्र पोहण्यात तरबेज होता. पोहता येत नसल्यामुळे त्यांनी हवेची एक ट्युब सोबत नेली होती.टेलटॅंकच्या मेन गेटच्या बाजुने पाण्याची खोली जास्त असल्याने हे तिघेही सांडव्याच्या बाजुने उथळ पाण्यात पोहण्यासाठी गेले.मात्र सांडव्याच्या बाजुने टेलटँक जेसीबी च्या साह्याने त्या ठिकाणचा मोठ्या प्रमाणात मुरुमाचा उपसा झाल्याने त्या ठिकाणी खोलवर मोठे मोठे खड्डे झाले आहेत. या तरुणांना नेमका या खड्यांचा अंदाज आला नाही आणि अचानक स्वराज कोकणे यांचा या खड्ड्यात तोल जावुन तो 20 ते 22 फुट खोलीच्या खड्यात बुडाला. व त्याच्या पाठोपाठ दुसरा देखील मित्र त्या खड्ड्यात बुडाला. मात्र पोहण्यात तरबेज असलेल्या तिसर्या मित्राने एका मित्राला तातडीने पाण्यातुन बाहेर काढले. त्याला बाहेर काढण्यात त्याचा वेळ गेल्याने स्वराज मात्र पाण्यात बुडाला. या घटनेने घाबरलेल्या दोन्ही मित्रांनी पाण्याबाहेर येवुन आरडाओरड केल्याने शेजारी पोहोण्यासाठी आलेले लोक मदतीला धावले. मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. ही वार्ता गावभर पसरताच नागरीकांनी टेलटँककडे धाव घेतली. जलतरणपटु रावसाहेब बनकर यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बराच वेळ पाण्यात शोध मोहीम सुरु होती. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर स्वराज याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.प्राईड अकडमीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुरेश गोपिनाथ कोकणे (बापू )यांचा स्वराज हा एकुलता एक मुलगा होता. श्रीरामपूर शहरात ही वार्ता पसरताच श्रीरामपूर चे तहसिलदार श्री. प्रशांत पाटील, आमदार श्री. लहु कानडे यांचे बंधु श्री. अशोक कानडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. अरुण पा. नाईक, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अॅड. समिन बागवान यांनी घटनास्थळाकडे धाव घेवुन घटनेची पाहणी केली. श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्री. बोरसे, टाकळीभान दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी घटनास्थळावर पूर्ण कार्यवाही होऊ पर्यंत उपस्थित होते. श्रीरामपूर नगरपालिकेच्या आग्नीशामक दलाच्या कर्मचार्यांनी शोध मेहीमेत अथक परिश्रम घेतले. या घटनेमुळे टाकळीभान परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.