पिंप्री अवघड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. परविनबानो बादशहा शेख यांची बहुमताने निवड झाली आहे.
राहुरी (प्रतिनिधी) तालुक्याच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या पिंप्री अवघड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. परविनबानो बादशहा शेख यांची बहुमताने निवड झाली आहे. पिंप्री अवघड ग्रामपंचायत मध्ये प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्य विजयी झाले होते, परंतु सरपंच निवडीत मात्र चार सदस्य विरोधात गेल्याने सरपंच पदासाठी निवडणूक होऊन परविन बानो बादशाह शेख यांना पाच तर सौ. आसराबाई भास्कर लांबे यांना चार मते मिळून सौ. परविनबानो शेख या विजयी झालेल्या आहे. गावाच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम सदस्याला सरपंच पदाचा मान मिळालेला आहे. यावेळी उपसरपंच लहानु सखाराम तमनर, सौ. मीनाक्षीताई सुरेश लांबे, सौ. रेखा बापु पटारे,सौ. प्रियंका विनोद बर्डे, तर विरोधी अमोल विजय गायकवाड, शिवाजी सोपान लांबे, उर्मिला शरद लांबे हे सदस्य उपस्थित होते. या निवडीसाठी प्रहारचे नेते सुरेशराव लांबे पाटील, बापूसाहेब पटारे, दीपक बर्डे, विनोद बर्डे, बादशाह शेख, मंजूरभाई शेख, राजेंद्र गायकवाड, अशोक बाचकर,गंगाधर कांबळे, नारायण कांबळे, मच्छिंद्र लांबे आदींनी परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी व्ही.ए. सोनवणे मॅडम यांनी काम बघितले. त्यांना कामगार तलाठी काळे, ग्रामसेवक चोखर मॅडम, कृष्णा कांबळे, संजय वाघमारे यांनी सहकार्य केले. नूतन सरपंच परविनबानो शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.