खेडले परमानंद येथे जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचे उपोषण सुरू मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष.

खेडले परमानंद येथे जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचे उपोषण सुरू मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका येथील खेडले परमानंद येथे जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक असुविधेसाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचे आज ५ रोजी उपोषणाला सुरुवात झाली असून. प्रशासनाच्या एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याची भेट नाही जाणीवपूर्वक हे प्रशासकीय अधिकारी या घटनेकडे डोळेझाकपणा करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. मात्र ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.

         या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पटांगण नाही ,मुलांसाठी टॉयलेट नाही, शाळेच्या प्रांगणात मोठमोठे खड्डे असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने डासाचे प्रमाण वाढले मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अनेक विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांनी उपोषण सुरू केले आहे.जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी येऊन या घटनेची दखल घेत नाही. तोपर्यंत उपोषण चालूच राहील .असे सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव शिंदे यांनी सांगितले. या घटनेचा परिसरातून निषेध करण्यात येत आहे. या उपोषणाचा प्रशासकीय अधिकारी याकडे लक्ष देणार आहेत की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. शाळेतील विद्यार्थीही या उपोषणातून काही मार्ग निघेल की नाही, आम्हाला काही सुविधा मिळतील की नाही या अशेने प्रशासनाकडे लक्ष ठेवून आहे.

         बी पी एस न्यूज अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी युनूस पठाण नेवासा.