ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज श्रीक्षेत्र मातापुर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान..!!

ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज श्रीक्षेत्र मातापुर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान..!!

श्रीरामपूर: :---
    श्रीक्षेत्र मातापुर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी चे दिनांक 27/6 /2022 रोजी मातापुर या ठिकाणाहून प्रस्थान झाले. मातापुर या ठिकाणावरून निघालेल्या पायी दिंडीचे चे मठाधीपती श्री सुदाम महाराज चौधरी  यांच्या नेतृत्वाखालील पंढरपूर दिंडीचे मातापुर येथुन  भव्य प्रस्थान झांले.  त्याप्रसंगी ह भ प सेवानंदगिरी महाराज गोरक्षनाथ आश्रम खोकर यांच्या हस्ते पालखी पूजन व रथ पूजन करण्यात आले.व पायी दिंडी चे प्रस्थान झाले. पायी दिंडी मध्ये कीर्तन व भजनाचे नेतृत्व ह.भ.प.  लहानु महाराज जाधव अशोकनगर तसेच ह.भ.प.  संतोष महाराज पटारे भोकर,  मृदुंगाचार्य ह.भ.प.लहानु महाराज व ह.भ.प रघुनाथ महाराज ऊडे तसेच विणेकरी ह.भ.प.फासाटे महाराज ,टेके मामा व गोरक्षनाथ वाकडे मातापूर व भोकर भजनी मंडळ यांच्याकडे आहे. मातापुर पायी दिंडी सोहळा चे  6 वर्ष असून यावर्षी अनेक भाविकांमध्ये उत्सवाचे वातावरण पसरले आहे. या दिंडीमध्ये विधी आरती प्रवचन व सत्संग हरिपाठ काकड भजन असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. करण ससाने, श्रीक्षेत्र मातापूर पायी दिंडीचे नेत्रुत्व विश्वस्त विश्वनाथ पांडुरंग ऊडे ,अप्पासाहेब ऊडे, ज्ञानदेव विनोद पा.उंडे ,अशोकराव पाटील शेळके अशोकनगर ,राजेंद्र पाटील उंडे, संजय नामदेव काळे ,गोविंदराव कोळसे ,परसराम शिरोळे, आप्पासाहेब पडोळे ,शशिकांत टेके ,सोपानराव जगताप,शिवाजी वाघ , दत्तात्रय पाटील पटारे, भाऊसाहेब पाटील पवार आदी विविध मान्यवर करीत आहे.श्रीक्षेत्र मातापूर पायी दिंडी मध्ये गीताताई ऊडे, सुनीताताई कुरे मदा उडे ,सुलोचना उडे मिराबाई उंडे, निर्मळताई, भांडताई,पठारेताई,शिरोळेताई दौंडताई यासह आज अनेक भगिनी सहभागी झाल्या आहेत.दिंडीच्या मार्गावर ठिकाणी रांगोळ्या काढण्याकरता सिद्धी उंडे समृद्धी उंडे खुशी उंडे गायत्री उंडे ईश्वरी उंडे श्रेया आढाव या तरुणींनी सहभाग नोंदवला
      दिंडीत आलेल्या वारकऱ्यांना श्रीरामपूर शहराच्या प्रत्येक चौकात फराळाचे,फळांचे, पाण्याच्या बाटल्या व पाऊच चे वाटप करण्यात आले. भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान श्रीक्षेत्र मातापूर या गावातून झाल संपूर्ण मातापूर गावामध्ये प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले.अनेक राजकीय नेत्यांनी व सामाजिक संस्थांनी निघालेल्या पायी दिंडीचे भव्य स्वागत ठिक ठिकाणी केले. दिंडी मध्ये रथ चालक सेवा अशोकराव शेळके,  ट्रॅक्टर वर पाण्याचा ट्रेनकर ची सेवा सोपानराव जगननाथ आढाव, लाईट डेकोरेशन ज्ञानेश्वर टेके व जय बाबाजी मित्र मंडळ मातापुर ,ट्रक चे सहकार्य भास्करराव शामराव पवार अशोकनगर आचारी सेवा सीताराम जनार्दन पाटील दौंड व मित्र मंडळ या सर्वा मार्फत करण्यात आली आहे. तसेच इतर सहकार्य माधव बाबा भजनी मंडळ, चेअरमन व्हाईस चेअरमन मातापूर विविध सहकारी सोसायटी ,चेअरमन व्हाईस चेअरमन बिग बागायतदार सोसायटी श्रीरामपूर,जय बाबाजी परिवार मातापुर, पंचक्रोशी पावन गणपती मित्र मंडळ ,राजमुद्रा मित्र मंडळ, शक्ती तरुण मंडळ मातापुर नीपाणी रोड, जय हनुमान मित्र मंडळ शेवाळे वस्ती,  सरपंच ,उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत मातापुर ,कानिफनाथ मित्र मंडळ मातपुर ,जगदंबादेवी मित्र मंडळ, गुरुदत्त तरुण मंडळ पाचवाडी सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ मातापुर व पंचक्रोशी या सर्वांचे लाभले आहे. .