साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी व्यसनमुक्ती जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
बालाजी देडगाव
(प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. व अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र विषयी अनमोल माहिती देत त्यांचा गौरव केला.
यानंतर सुप्रसिद्ध मिलन ब्रास बँड देवळाली या नामांकित बँड पथकाने फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व सजावट केलेल्या रथामध्ये अण्णाभाऊ साठे यांची यांच्या प्रतिमेची गावभर मिरवणूक थाटामाटात संपन्न करण्यात आली. या मिरवणुकीसाठी सर्व जाती धर्माचे लोक व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंच यांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे, अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे ,सरपंच चंद्रकांत मुंगसे ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने,युवा नेते निलेश कोकरे ,भाजपा युवा मोर्चाचे आकाश चेडे, मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बळीराजा संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, श्री गणेश कृषी उद्योग समूहाचे विलासराव मुंगसे, चाइल्ड करिअर शाळेचे संस्थापक सागर सर बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते बलभीम सकट, किशोर वांढेकर ,विश्वनाथ ससाणे, वसंतराव ससाणे,विलासराव ससाणे, संपतराव ससाणे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी रावण ससाने,सुनीलराव ससाने ,राजेंद्र ससाने, जितेंद्र ससाणे ,किशोर ससाने ,सोमनाथ ससाने, बंडू शिरसाठ, नितीन ससाने ,अजित ससाने , प्रशांत सासणे, शिवाजी ससाणे व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंच, प्रतिष्ठान यांनी यावर्षी व्यसनमुक्ती जयंती म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता थाटामाटा त जयंती साजरी करायची हे ध्येय बाळगलं.त्यामुळे या जयंतीचे परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
तरी या कार्यक्रमासाठी नेवासा पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल साहेब ,पोलीस तुकाराम खेडकर दादा ,धायतडक दादा, साळवे दादा यांनी भेट देत या जयंतीनिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.