नगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करा,अन्यथा 1 सप्टेंबरला राहुरी मुळा नदीवरील पुलावर महामार्ग बेमुदत बंद .

नगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करा,अन्यथा 1 सप्टेंबरला राहुरी मुळा नदीवरील पुलावर महामार्ग बेमुदत बंद .

*नगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करा,*

*अन्यथा १ सप्टेंबरला राहुरी मुळा नदीवरील पुलावर महामार्ग बेमुदत बंद .

             राहुरी कारखाना येथे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस लोणीच्या सौ.प्रभावती घोगरे,मा.आ.भाऊसाहेब कांबळे,मा.नगराध्यक्ष सत्यजित कदम,धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे,दिपक त्रिभुवन,मनसे नेते नितीन कल्हापुरे,कृती समितीचे वसंत कदम,देवेंद्र लांबे,सुनिल विश्वासराव, अनिल येवले, संदीप कोठुळे उपस्थित होते.

             या प्रसंगी नगर मनमाड रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सर्व वक्त्यांनी संताप व्यक्त केला.सौ.प्रभावती घोगरे यांनी कृती समिती या पुढे जो निर्णय घेईल त्या निर्णया सोबत राहता तालुक्यात नागरिक सहभाग नोंदवतील असे सांगितले.राजूभाऊ शेटे यांनी कृती समितीच्या लढ्यामुळे महामार्गाचे आंदोलन देशात पोहोचल्याचे सांगितले.केंद्रीय मंत्री यांची भेट घेण्यासाठी नागपूरला समितीच्या सदस्यांना घेवून जाण्यासाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले.सत्यजित कदम यांनी महामार्गाच्या आंदोलना मध्ये कोणीही राजकारण न आणता सर्व सामान्यांचा लढा म्हणून सहभाग नोंदवावा.कृती समितीच्या सदस्यांना वरिष्ठ मंत्र्यांची भेट घ्यायची असल्यास नियोजन करण्यात येईल असे सत्यजित कदम यांनी सांगितले.

           या प्रसंगी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला कि जो पर्यंत नगर मनमाड महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी कारण अवजड वाहतुकीमुळे महामार्गावरील बुजवलेले खड्डे पुन्हा तयार होतात.झालेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत.कोल्हार ते नगर रोज अनेक तरुण MIDC येथे कामानिमित्त जात असतात.या खड्ड्यांमुळे शेकडो तरुणांचे व पप्रवाशांचे प्राण गेलेले आहेत.त्यामुळे नगर मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूचा एक रस्ता दुरुस्त करावा व जो पर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात यावी.मागणी मान्य न झाल्यास दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी नगर मनमाड महामार्ग जोडणाऱ्या राहुरी येथील मुळा नदीवरील पुलावर बेमुदत रस्ता बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

            या प्रसंगी आदिनाथ कराळे,वैभव गिरमे,शैलेंद्र कदम,डॉ संदीप मुसमाडे,वंचित तालुकाध्यक्ष संतोष चोळके,मनसे तालुकाध्यक्ष मनोज जाधव,मा उपनगराध्यक्ष अनंत कदम ,प्रशांत काळे, जयेश मुसमाडे,अभिजित आहेर,शिवचरित्रकार हसन सय्यद,पत्रकार राजेंद्र उंडे,राजेंद्र बोरुडे,सुधाकर आदिक, शिवाजी घाडगे,आशिष संसारे,वैष्णवी चौक अध्यक्ष अमोल कदम, ज्ञानेश्वर मोरे,वैभव गाढे,चंद्रकांत कपाळे, किरण चव्हाण,प्रशांत मुसमाडे,संदीप वरखडे,नवनाथ गजर,विजय पेरणे,शेतकरी सेनेचे बाबासाहेब कदम,मुन्ना अन्सारी,रोहित नालकर,अशोक तनपुरे,अरुण पटारे,सुनील जाधव,सुहास महाजन सर,धनंजय विटनोर,महेंद्र शेळके,अशोक तनपुरे, बाळासाहेब वाळुंज,रफिक सय्यद,प्रकाश सोनी,दत्तात्रय दरंदले,संदीप आढाव,संतोष कराळे,जालिंदर मुसमाडे,महेंद्र दोंड,सौरभ शिंदे,सचिन जाधव,गौरव घोलप,संजय वाणी,बाबासाहेब खांदे, संतोष कराळे,सुशील गोसावी,मनोज कदम,प्रसाद कदम,सचिन कदम,मनोज गावडे, सुजित सिनारे,अनिल जाधव,धनंजय डोंगरे,नितीन वाघ,साई सातपुते,रोहित वाकचौरे,सचिन काळे,अविनाश गायके,सूरज पठाण,परवेज पठाण, संतोष हारदे त्याचबरोबर भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार गट), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार गट),शिवसेना (शिंदे गट ), वंचित बहुजन आघाडी,मनसे,शांती चौक मित्र मंडळ,साई प्रतिष्ठान,चालक मालक संघटना,वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान, अंबिका मित्र मंडळ,शिवबा प्रतिष्ठान,धर्मवीर संघटना,साम्राज्य ग्रुप व कृती समितीचे सदस्य असे विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

           * शासकीय कामा निमित्त जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांचा दौरा नगर मनमाड महामार्गावरून जात असतांना रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी राहुरी कारखाना येथे थांबवत जिल्हाधिकारी यांना महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत पत्र दिले तसेच महामार्गावरील आत्तापर्यंत झालेल्या अपघातांमुळे शेकडो कुटुंब उध्वस्त झाल्याचे निदर्शनास आणून दिलेयावेळी चर्चेत सत्यजित कदम,देवेंद्र लांबे,वसंत कदम,आदिनाथ कराळे,सुनील विश्वासराव,प्रशांत मुसमाडे ,प्रशांत काळे,वैभव गाढे यांच्यासह समितीचे सहभागी झाले होते* .

          *नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे.रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे.खा.निलेश लंके यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून होणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेत सक्रीय सहभाग असेल असे मा.मंत्री तथा आ.प्राजक्त तनपुरे यांनी फोनवर संपर्क साधत बैठकीला जमलेल्या सदस्यांना सांगितेल.*