कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील सर्व डाॅक्टारांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते.

कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ  शहरातील सर्व डाॅक्टारांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते.
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ  शहरातील सर्व डाॅक्टारांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते.

श्रीरामपूर, ता. १७ ः कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील सर्व डाॅक्टारांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. तसेच सायंकाळी शहरातील निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच केंद्र व राज्य सरकारने डाॅक्टरांवर सतत होणा-या हल्ल्यांविरोधात कायदा करण्याची मागणी करण्यात आली.

              इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन, संत लूक हाॅस्पिटल नर्सिंग स्कूल, साखर कामगार नर्सिंग स्कूल, लॅब टेक्निशियन असोसिएशन, आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने शहारातील मुख्य रस्ता, शिवाजी रस्ता मार्गे निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आझाद मैदानावर निषेध सभा पार पडली. दरम्यान, आज दिवसभर सर्व डाॅक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. अतितातडीच्या सेवेसाठी साखर कामगार रूग्णालय, संत लूक हाॅस्पिटल, संजीवनी हाॅस्पिटल येथे तपासणी सेवा सुरू होती.

               

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.निलेश सदावर्ते, उपाध्यक्ष डाॅ. अतुल करवा, सचिव डाॅ. संकल्प शिरसाठ, खजिनदार डाॅ. प्रफुल्ल देशपांडे,डॉ.संजय शेळके, डॉ.अजित देशपांडे, डॉ.दिलीप शिरसाठ, अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ.दिलीप शिरसाठ, संत लूक्स नर्सिंग स्कूलच्या सिस्टर्स यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ.वर्षा शिरसाठ, डॉ.ज्ञानेश्वर राहींज, डॉ.प्रदीप टिळेकर, डाॅ.संकेत मुंदडा, डाॅ.नवनीत जोशी,  डॉ.अफराज तांबोळी, डॉ.रवींद्र कवडे, डाॅ. अजय फुलवर, श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.दिलीप शेजवळ, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.उज्वला कवडे, सचिव डॉ. मिनल फुलवर, खजिनदार डॉ.अर्चना शेळके, डॉ. गौरी बधे आदींसह नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिंनी, लॅब टेक्निशियन असोसिएशन, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.