संचालक डॉ .महावीरसिंग चौहान यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर .
*संचालक डाॅ.महावीरसिंग चौहान यांना सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम समन्वयक म्हणून व महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*
*राहुरी विद्यापीठ, दि. 17 ऑगस्ट, 2024*
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा सन २०२२-२३ या वर्षीचा कृषि व अकृषि विद्यापीठांचे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी येथील संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी पदावर कार्यरत असलेले प्रा. डाॅ. महावीरसिंग चौहान यांना सन 2022-23 वर्षासाठीचा राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून राज्य पुरस्कार तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
डाॅ महावीरसिंग चौहान हे गोंडगाव, ता.भडगाव जि.जळगाव येथील आहेत. प्रा. डाॅ. महावीरसिंग चौहान हे कृषि रसायनशास्त्र व मृदशास्त्र विषयात एम.एस्सी. अॅग्री व पी. एचडी. असून एकुण 32 वर्षापासून ते प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यातील 6 वर्षापासून ते महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत दहा जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून धुरा सांभाळल्यापासून कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये निस्वार्थी भावनेने व एकनिष्ठेने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध समाज व विद्यार्थी हिताचे कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत. त्यांची या कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाद्वारे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर राहुरी कृषि विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे शासनाने दिलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे राहुरी कृषि विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. डाॅ. महावीरसिंग चौहान स्वतः उत्कृष्ठ गायक , वादक, संगितकार, कवी, गितकार,अभिनेते व पहीलवानही आहेत.महात्मा फुले कृषि विद्यापिठाच्या स्थापनेनंतर 55 वर्षानी विद्यापीठासाठी विद्यापीठ गीत त्यांनी लिहीले, संगितबद्ध केले व गायनही त्यांनी केलेले आहे. प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. या पुरस्कारामुळे महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे सन्माननीय कुलगुरू डाॅ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डाॅ. दिलीप पवार, संशोधन संचालक डाॅ.विठ्ठल शिर्के, कृषी विस्तार शिक्षण संचालक डाॅ.गोरक्ष ससाणे , पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. साताप्पा खरबडे व कुलसचिव श्री. अरुण आनंदकर,राज्याचे विद्यमान एन एस एस प्रमुख डाॅ. निलेश पाठक तसेच महाराष्ट्र आणी गोवाचे विभागिय संचालक श्री. अजय शिंदे या सर्वांनी तसेच दहा जिल्ह्यातील आजी माजी प्राचार्य , कार्यक्रम अधिकारी , विद्यापिठातील सर्व प्राध्यापक अधिकारी व कर्मचारी यांनी डाॅ. महावीरसिंग चौहान यांचे हार्दीक अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनी म्हणजे दि. 24 सप्टेबर, 2024 रोजी एका खास कार्यक्रमात पुरस्कार दिला जाणार आहे.