उपोषण कर्ते संतोष टांगळ यांचे तहसीलदार संजय बिराजदार यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित.
*उपोषण कर्ते संतोष टांगळ यांचे तहसीलदार संजय बिराजदार यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडले.*
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ गेल्या चार दिवसापासून तलाठी कार्यालय समोर उपोषणास बसले होते. त्यांना त्यांच्या गट नंबर ५८३,५८४ या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने उपोषण ची वेळ आली होती.अखेर आज नेवासा तहसीलदार संजय बिराजदार यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन स्तळपाहणी केली असता शेतकऱ्याच्या अडीअडचणी समजून घेतल्या . व प्रशासकीय कायद्यानुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये निकाल बजावू असे आश्वासन दिले.

एकंदरीत सर्व परिस्थिती बघत संतोष टांगळ यांना लेखी आश्वासन दिल्यामुळे संतोष टांगळ यांनी प्रशासनाला सहकार्य करत रस्त्याच्या मागणीसाठी असलेले उपोषण अखेर तहसीलदार च्या मदतीने सरबत घेत सोडले.

यावेळी विद्यमान सरपंच यांनी तहसीलदार संजय बिराजदार यांचे या निर्णयाचे स्वागत करत. त्यांचे ग्रामस्थाच्या वतीने अभिनंदन केले व गावातील असेच सहा ते सात बंद झाले रस्ते खुले करावे अशी मागणी केली. चिखलाच्या रस्त्यावर चालत बांधावर जाऊन शेतकऱ्याचा वाली होणारा असा अधिकारी पाहिला नाही असे म्हणत अशा अधिकाऱ्याचे देडगाव ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

यावेळी बालाजी देवस्थान अध्यक्ष नवनाथ मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे ,भाजप तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, गणपती विश्वस्त अशोक मुंगसे, पत्रकार युनूस पठाण ,दादा पळसकर , भारत औटी, सदानंद साळवे, अर्जुन घोडके,देविदास मुंगसे ,दिलदार सय्यद, पप्पू चेडे, संजय देवकाते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर आजच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार शिरीष कुलकर्णी साहेब, देडगाव मंडलाधिकारी सुनील खंडागळे, तलाठी जाधव भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब म्हस्के, फकीरचंद हिवाळे ,कोतवाल अविनाश हिवाळे यांनी योग्य आयोजन केले.








