निर्मला नवले यांची राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड ; नाथ प्रितिष्ठानच्या सौरभ उंडेंनी केला सन्मान .

निर्मला नवले यांची राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड ; नाथ प्रितिष्ठानच्या सौरभ उंडेंनी केला सन्मान .

निर्मला नवले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड; नाथ प्रतिष्ठानचे सौरभ उंडेंनी केला सत्कार

 

 

             राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून, पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते निर्मला नवले यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.

 

              दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी राहुरी शहरातील नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सौरभ उंडे यांनी कारेगाव येथे निर्मला नवले यांची भेट घेऊन त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करून अभिनंदन केले. तसेच नव्या जबाबदारीसाठी त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

           यावेळी पुणे जिल्ह्यातील बाभुळसरचे सरपंच दशरथ शंकर फड, सोनाली दशरथ फड तसेच युवा उद्योजक शुभम नवले उपस्थित होते. याशिवाय नाथ प्रतिष्ठानचे सागर शेटे, अजित उंडे, तुषार ढवळे, श्रेयस लोळगे, सुशील उंडे, बंटी धनवटे, सचिन ढवळे, दादासाहेब कर्डक, अभिषेक मोटे आणि अजिंक्य उदावंत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.