गौरव नारी शक्तीचा , उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमांतर्गत फुले कृषी वाहिनीवर श्रीमती सुरेखा आढाव यांची मुलाखत संपन्न .

गौरव नारी शक्तीचा , उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमांतर्गत फुले कृषी वाहिनीवर श्रीमती सुरेखा आढाव यांची मुलाखत संपन्न .

         राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कुलगुरू पी. जी पाटील यांनी फुले कृषी वाहिनी सुरु केली आहे . या वाहिनीवर  नवरात्री उत्सवा निमित्त गौरव नारी शक्तिचा, उत्सव नवरात्रीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात येत आहे . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना या कार्यक्रमात बोलावून त्यांची मुलाखत घेऊन वाहिनीच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे . समाजास चांगली प्रेरणा मिळावी व काहितरी बदल घडावा हा यामगचा मुख्य उद्देश आहे .

   

           सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे अनेक शिक्षक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करून विद्यालयाच्या नावलौकिकात विशेष भर घालत आहेत . त्यातीलच एक महिला शिक्षिका श्रीमती . सुरेखा आढाव यांचाही समावेश आहे . त्यांची यशोगाथा टिपण्यासाठी फुले कृषी वाहिनीने गौरव नारी शक्तिचा, उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमादरम्यान  श्रीमती . सुरेखा आढाव यांना आमंत्रित करून मुलाखत घेतली .

. मुलाखाती दरम्यान श्रीमती . आढाव यांनी जीवनात आलेले खूप छान असे अनुभव सांगून जीवन प्रवास उलगडला . श्रीमती .आढाव यांनी दिलेली मुलाखत नक्कीच सर्व महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे .फुले कृषी वाहिनीने सुरू केलेल्या गौरव नारी शक्तीच, उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमाचेही श्रीमती . आढाव यांनी सर्व महिलांच्य वतीने आपल्या शब्दसुमनांनी स्वागत केले .

            श्रीमती . सुरेखा आढाव यांनी दिलेल्या विशेष मुलाखती बदद्ल सावित्रिबाई फुले माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या आहेत तसेच हा उल्लेखनीय कार्यक्रम सुरू केल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापिठाचेही सर्व माता भगिनिंच्या वतिने कौतुक होत आहे .