राहुरी शहरातील मल्लनिसा लाईनचा सावळा गोंधळ.

राहुरी शहरातील मल्लनिसा लाईनचा सावळा गोंधळ.

राहुरी शहरातील ड्रेनेज लाईनचा सावळा गोंधळ                      

राहुरी शहरातील कानिफनाथ चौक येथे नुकत्याच केलेल्या ड्रेनेज लाईनचे पाईपलाईन फुटली असल्याकारणाने रस्त्यावरून ड्रेनेज लाईनचे पाणी वाहत आहे . गेल्या आठ दिवसापासून हे पाणी रस्त्यावर वाहत असून पावसाळ्याचे दिवस आहे आणि सध्या राहुरी शहरांमध्ये डेंगू आजाराचे थैमान असून पाणी रस्त्यावरून जात असून त्यामुळे साथीचे आजार पसरवण्यामध्ये या पाण्याची भर पडत आहे . जवळच विद्या मंदिर ची शाळा असून लहान लहान मुले या ठिकाणाहून ये जा करतात तरीही राहुरी नगरपालिकेचे या सांडपाण्याकडे लक्ष नसून राहुरी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून राहुरी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी बिनधास्त असून याकडे दुर्लक्ष करतात . बघ्याची भूमिका घेऊन जनतेची काळजी नसल्या सारखे दिसत आहे . नुकतेच गणपती विसर्जन झाले असून या ठिकाणी या पाण्यातूनच गणपती विसर्जन मिरवणूक जाण्याचा मार्ग होता . या नालीच्या पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे हाल होत असून नगरपालिकेने वेळेत दक्षता घ्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.