“कॅप्टन फाईल” प्रकरण तापले; ५८ व्हिडिओंचा दावा, शेकडो महिलांचा प्रश्न - रुपाली चाकणकर अडचणीत?

“कॅप्टन फाईल” प्रकरण तापले; ५८ व्हिडिओंचा दावा, शेकडो महिलांचा प्रश्न - रुपाली चाकणकर अडचणीत?

नाशिक_प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४:

“कॅप्टन फाईल” प्रकरण तापले; ५८ व्हिडिओंचा दावा, शेकडो महिलांचा प्रश्न - रुपाली चाकणकर अडचणीत?

महाराष्ट्रात सध्या “कॅप्टन फाईल” प्रकरणाने मोठे वादळ निर्माण केले असून, या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक दावे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात गंभीर आरोप आधीच समोर आले असताना, आता आणखी ५८ व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात शेकडो महिला फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, गेल्या वर्षी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, हे प्रकरण वर्षभरापूर्वीच समोर आले होते, मात्र तेव्हा काही प्रभावशाली व्यक्तींनी दबाव टाकून ते दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या नावाचीही चर्चा रंगू लागली आहे. काही माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की, पत्रकारांना धमकावून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न रुपाली चाकनकर यांनी केला होता.
सध्या या सर्व घडामोडींमुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून आरोपी अशोक खरात याच्या विरोधातील तक्रारींची चौकशी सुरू असून, आणखी पीडित महिला समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा या कथित व्हिडिओंचीही पडताळणी करत असल्याची माहिती मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि प्रभावशाली लोकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.