शब्दगंधचे पारितोषिक वितरण व काव्यसंमेलन *"लिहित्या हातांना बळ देण्यासाठी शब्दगंधचे काम"* नगरसेविका- सौ.दिपालीताई बारस्कर

शब्दगंधचे पारितोषिक वितरण व काव्यसंमेलन "लिहित्या हातांना बळ देण्यासाठी शब्दगंधचे काम" नगरसेविका- सौ.दिपालीताई बारस्कर अहमदनगर : *सुख दुःखाच्या भावना कागदावर उतरवल्या की साहित्य तयार होते, साहित्य जगण्याला उर्मी देते,शब्दांना जपून ठेवणाऱ्या,योग्य त्या ठिकाणीं वापरणाऱ्या माणसांचं संघटन म्हणजे शब्दगंध असून यामुळे अनेक हात लिहिते झालेले आहेत, या लिहित्या हातांना जोमाने बळ देण्याचे काम शब्दगंध चळवळ करत आहे* असे प्रतिपादन अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ दिपालीताई बारस्कर यांनी केले. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी आयोजित काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण व काव्यसंमेलन महात्मा फुले कृषी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा.डॉ. महाविरसिंह चौहाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्यावेळीं त्या बोलत होत्या.यावेळी विचारपिठावर जेष्ठ साहित्यिक ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य, डॉ.जी. पी.ढाकणे,अजयकुमार पवार, शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी,किशोर डोंगरे, राजेंद्र चोभे हे होतें. पुढे बोलताना सौ.बारवकर म्हणाल्या की, बहिणाबाई सारख्या अल्पशिक्षित महिलेने आपल्या रचनांच्या माध्यमातून समाजमनावर प्रतिबिंब उमटवले असून सकारात्मक जगण्याचा संदेश दिलेला आहे. यावेळी डॉ.महाविरसिंह चौहाण म्हणाले की, साहित्य हे माणसाला कसं जगायचं हे शिकवते, तान तणावातून मुक्ती मिळण्यासाठी कथा,कविता वाचणे, लिहिणे आवश्यक असून त्यामुळे मनप्रसन्न होते, छोट्या स्वरूपात होत असलेले काव्यसंमेलन निश्चितच प्रेरणा देणारे आहे. अनुभवातून कसदार लेखन होत असते त्यासाठी डोळे उघडे ठेवून साहित्यिकांनी वावरायला हवे. लेखनात सातत्य ठेवायला हवे. प्राचार्य, जी.पी.ढाकणे, ज्ञानदेव पांडूळे, मार्केट कमिटी चे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी काव्यसंमेलनात मनीषा गायकवाड, बाळासाहेब मन्तोडे, ऋता ठाकूर, स्वाती ठुबे, बाळासाहेब अमृते, सुरेखा घोलप भूकन, विनोद शिंदे, रज्जाक शेख, कृष्णा अमृते, मारुती सावंत, आत्माराम शेवाळे, सुनंदा नागुल, प्रियंका सुंबे, कार्तिक झेंडे, अविष्कार इकडे, विनायक पवळे, पेंटर दादासाहेब पठारे, आनंदा साळवे, महादेव लांडगे यांनी आपल्या रचना सादर केल्या. कार्यक्रमांचे प्रास्ताविक सुनील गोसावी यांनी केले. काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर बबनराव गिरी यांनी आभार मानले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र चोभे यांची तर नगर तालुका शब्दगंध शाखेचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब अमृते,उपाध्यक्ष म्हणुन सुनंदा नागुल व मारूती खडके यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र उदागे, अजयकुमार पवार,राज्य कार्यकारणी सदस्य किशोर डोंगरे, राजेंद्र पवार, स्वाती ठूबे, बबनराव गिरी, जयश्री झरेकर, बाळासाहेब शेंदूरकर, हर्षली गिरी, वॉरियर्स फाउंडेशन च्या संगीता गिरी, आरती गिरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी ऍड विद्याधर ढाकणे, योगेश पंडित, सुजाता रानडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्तिक झेंडे, प्रियांका सूंबे, आविष्कार इकडे, अनुष्का पंडित यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे शेवटी कुलगुरू नागनाथ कोतापल्ले, शिवाजी महाराज राऊत, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, संपादक महेंद्र कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शब्दगंधचे पारितोषिक वितरण व काव्यसंमेलन *"लिहित्या हातांना बळ देण्यासाठी शब्दगंधचे काम"* नगरसेविका- सौ.दिपालीताई बारस्कर